हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा एक कृषीप्रधान देश असून, आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या (Rich Indian Farmers) प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. आजही अनेकजण शेतीमधून अपेक्षित कमाई होत नसल्याची तक्रार करत आहेत. खरे तर, अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा वेगवेगळ्या संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही हे खरे आहे. शेतीत उत्पादित झालेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही. यामुळे शेतीमधून शेतकऱ्यांना (Rich Indian Farmers) प्राप्त होत असलेल्या कमाईचा आकडा लहान होत चालला आहे.
याउलट अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी चांगली कमाई करून दाखवली आहे. आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत टॉप पाच शेतकऱ्यांची (Rich Indian Farmers) माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे या पाच शेतकऱ्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा देखील समावेश होतो.
‘ही’ आहेत श्रीमंत शेतकऱ्यांची नावे? (Rich Indian Farmers)
1) ज्ञानेश्वर बोडके : पुण्यातील ज्ञानेश्वर बोडके हे देशातील सर्वाधिक श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीत आहेत. ते प्रयोगशील शेतकरी असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी अभिनव फार्मर्स क्लब नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी स्थापित केलेल्या क्लब मध्ये सध्या दीड लाख शेतकरी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
2) गीनाभाई पटेल : गुजरात मधील गीनाभाई दोन्ही पायाने अपंग आहेत. लहानपणी त्यांना पोलिओमुळे अपंगत्व आले आहे. मात्र असे असतानाही त्यांनी जिद्द आणि कष्टाच्या बळावर शेतीमध्ये नेत्र दीपक कामगिरी केली आहे. ते प्रयोगशील डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. डाळिंब पिकातून त्यांनी चांगली कमाई केली असून त्यांनी शेतीमध्ये केलेल्या उत्कृष्ट अशा कामगिरीमुळे त्यांना पद्मश्री मिळाला आहे.
3) हरीश धनदेव : कधीकाळी सरकारी नोकरी करणारा हा अवलिया आता कोरफड उत्पादित करून करोडो रुपयांची कमाई करत आहे. हरीश सांगतात की त्यांनी दिल्लीमधील एका कृषी प्रदर्शनाला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि शेती व्यवसायात उतरले. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी कोरफड शेती सुरू केली. आज ते देशातील सर्वाधिक श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये येतात.
4) खेमा रामजी : खेमा रामजी हे देखील भारतातील सर्वाधिक श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये येतात. या अवलिया शेतकऱ्याला इजराइलला भेट देण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून त्यांनी शेतीचे नवीन तंत्र आत्मसात केले आहे. सध्या या शेतकऱ्याकडे एक कोटी वार्षिक उलाढाल असणारे 200 पॉलिहाऊस आहेत.
5) प्रमोद गौतम : हे देखील भारतातील सर्वाधिक श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीत येतात. प्रमोद यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना हवी होती तशी नोकरी त्यांना मिळाली. मात्र, नोकरीमध्ये मन लागत नव्हते यामुळे त्यांनी 2006 मध्ये नोकरी सोडली आणि आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या 26 एकर जमिनीवर शेती सुरू केली. आज ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीत आले आहेत.