Bullock Cart Race: शेतकर्‍याचा नादच खुळा, खरेदी केली 21 लाखांना ‘किटली’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी जे करेल ते हटके स्टाईल मध्ये (Bullock Cart Race) आणि याचा प्रत्यय नुकताच आलेला आहे. पुण्याच्या (Pune) खेड तालुक्यातील एका शेतकर्‍याने तब्बल 21 लाख रुपये मोजून खरेदी केलेली आहे ‘किटली’ आहे. त्याची सध्या पंचक्रोशीत तुफान चर्चा रंगली आहे (Bullock Cart Race).

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किटली आहे तरी काय? आणि एवढी किंमत मोजावी असे त्यात काय वैशिष्ट्ये आहे?

तर मंडळी हा किटली नावाचा बैल (Kitali Bull) आहे. शेतकर्‍याने या किटलीसाठी इतकी मोठी रक्कम मोजली आहे. या महागड्या किटली बैलाला (Bullock Cart Race Bull) पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे.

एक बैल 21 लाखांना

बैलगाडा शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी हटवल्यानंतर बैलाच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल 21 लाखांना एका बैलाची खरेदी केली आहे. एखाद्या आलिशान कारच्या किंमती इतकीच किंमत त्यांनी मोजली आहे. पाचारणे यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यांनी या बैलाचे स्वागत केले. सध्या या बैलाला (Bullock Cart Race) पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत.

बैल बाजारात लाखोंची उलाढाल

बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात (Bull Market) पुन्हा एकदा लाखो रूपयांची उलाढाल होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री (Bull Sale) करण्यासाठी शेतकरी येत आहेत. अशाच प्रकारे खेड (Khed Taluka) तालुक्यातील पाचारने वाडी येथील शेतकर्‍याने शर्यती मध्ये धावणाऱ्या बैलाची 21 लाखांना खरेदी केली आहे.

इअर टॅग आवश्यक

इअर टॅग (Ear Tag) एक बारकोड पद्धती आहे, जी सॉफ्टवेअर मध्ये डेव्हलप केलेली आहे. त्याची नोंद भारत सरकारकडे असते. बाजार समिती, आठवडी बाजार खरेदी विक्री संघ, यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना हा इअर टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावे लागणार आहे. नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी, असा शासन आदेश आला आहे. तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इअर टॅगिंग जरुर करुन घ्या.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.