PM Kisan Samman Nidhi Yojana: जाणून घ्या, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन शासन निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजना शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता महत्त्वाची योजना आहे. सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार आयुक्त (कृषि) यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) धर्तीवर एक व सदर योजनेसाठी (PM Kisan Samman Nidhi Yojana) राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत.

सद्यस्थितीत, कृषि आयुक्तालयाने सदर योजनेंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त, कृषि यांचे स्तरावर सदर योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरुन खालील प्रमाणे शासन निर्णय (PM Kisan Samman Nidhi Yojana) निर्गमित करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन शासन निर्णय – (PM Kisan Samman Nidhi GR)

  • केंद्र पुरस्कृत (Central Government Scheme) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • सदर योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त (कृषि) यांचे स्तरावर आयुक्त (कृषि) यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अटी व शर्ती (PM Kisan Samman Nidhi Yojana)

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रक्कमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा. सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे असतील.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त (कृषि) यांचे नावे उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रक्कमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा.
  • सदर खात्यासाठी मेकर म्हणून कृषि आयुक्तालयातील लेखाधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून कृषि आयुक्तालयातील सहाय्यक संचालक (लेखा-1) हे असतील.
  • सदर योजनेकरिता प्राप्त होणारे अनुदान त्या त्या वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजूरीने मुदत वाढीकरिता खर्च करता येईल. ज्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली नाही, अशा प्रकरणी सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कमा शासनाकडे समायोजित करणे आवश्यक राहील.
  • सदर बँक खात्यांमध्ये जमा होणाऱ्या व्याजा संदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे कार्यवाही संबंधितांनी करावी.
  • सदर बँक खात्यातील व्यवहारांचे नियमितपणे ताळमेळ करणे तसेच लेखा परिक्षण करणे आवश्यक राहिल.
  • सदरचे बँक खाते बंद केल्यास, त्यामधील शिल्लक रक्कमेचा ताळमेळ घेऊन अखर्चित रक्कम योग्य त्या शासन लेखाशिर्षाखाली तात्काळ जमा करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.
  • सदरहू बँक खात्यांचे संनियंत्रण, लेखा परिक्षण व ताळमेळ इ. बाबत वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश/सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, याबाबत आयुक्त (कृषि) यांच्याकडून दक्षता घेण्यात येईल.
  • प्रस्तुत योजना राबवताना केंद्र शासनाच्या निकषांची पूर्तता होईल याची आयुक्त (कृषि) यांच्याकडून खात्री करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा ‘यांना’ मिळणार नाही ‘पीएम किसान सन्मान निधी योजनेचा’ 17वा हप्ता!  

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.