CARI Nirbheek Hen : ‘कॅरी निर्भीक’ कोंबडी वर्षाला देते 200 अंडी; पोल्ट्री व्यवसायासाठी आहे उत्तम पर्याय!

CARI Nirbheek Hen For Poultry Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात कुक्कुट पालन व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक कोंबडी (CARI Nirbheek Hen) चांगलीच फायदेशीर ठरणारी आहे. या कोंबडीचे पालन केल्यास उत्तम फायदा होण्याची गॅरंटी आहे. बेरोजगार तरुणांना कुक्कुट पालनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून बॅंक कर्ज देखील मिळते. त्यामुळे ज्यांना कमी भांडवलात कुक्कुट पालनाचा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी ही कोंबडी चक्क वरदान ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कोंबडीच्या कॅरी निर्भीक (CARI Nirbheek Hen) नावाच्या जातीबद्दल जाणून घेणार आहोत.

व्यवसायातून मिळेल दामदुप्पट नफा (CARI Nirbheek Hen For Poultry Farming)

कॅरी निर्भिक ही कोंबडीची (CARI Nirbheek Hen) एक देशी जात आहे, जिचे मांस प्रथिने गुणधर्मांनी समृद्ध आहे. ही कोंबडी अतिशय चपळ असते. आकाराने मोठी, ताकदवान, दिसायला देखणी, स्वभावाने लढाऊ आणि मजबूत प्रतिकार शक्तीची असते. सुमारे 20 आठवड्यांच्या आतच या कोंबड्यांचे वजन 1847 ग्रॅमपर्यंत पोहोचते. दरवर्षी या कोंबड्या तब्बल 190 ते 200 अंडी देतात. आणि प्रत्येक अंड्यांचे वजन 45 ग्रॅम असते. कॅरी निर्भीक कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म सुरू करून कमी खर्चात शेतकऱ्यांना दामदुप्पट नफा कमाविता येऊ शकतो. इंडो – जर्मन यांच्या संयुक्त प्रयत्नातून या कोंबडीची जात साल 2000 मध्ये विकसित करण्यात आली होती.

कॅरी निर्भीकची वैशिष्ट्ये

उत्कृष्ट अंडी उत्पादन : वर्षाला 190 ते 200 अंडी देते. प्रत्येक अंडे 45 ग्रॅम वजनाचे असते.
जलद वाढ : 20 आठवड्यांत 1847 ग्रॅमपर्यंत वजन वाढते.
उत्तम दर्जाचे मांस : प्रथिने गुणधर्मांनी समृद्ध, चविष्ट आणि रसाळ असते.
रोगप्रतिकारशक्ती : मजबूत रोगप्रतिकारशक्ती, रोगांना बळी पडत नाही.
पोषण : कमी खाद्यपदार्थावरही चांगली वाढ होते.

कर्ज मिळण्याचीही सुविधा

कॅरी निर्भीक कोंबडी कमी खर्चात जास्त नफा देते. यामुळे लहान शेतकरी आणि तरुण उद्योजक सहजपणे हा व्यवसाय सुरू करू शकतात. विशेष म्हणजे राज्य सरकार कुकुटपालन योजनेद्वारे कुक्कुटपालनासाठी बँक कर्ज देखील मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्रामीण भागात या प्रजातीच्या कोंबडीच्या मदतीने सहज कुकुटपालन व्यवसाय करू शकतात.