Fodder Depot: पशुधन वाचविण्यासाठी तातडीने ‘चारा डेपो’ सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच चारा (Fodder Depot) सध्या राज्यात शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने (State Government) एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा डेपो (Fodder Depot) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे चारा डेपो 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहतील.

दुष्काळी भागात तातडीने चारा (Fodder Depot), पाणी व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनास दिले होते.

पशुधनाची संख्या, चारा टंचाईची तीव्रता (Fodder Shortage), पशु संवर्धन विभागाचा (Department Of Animal Husbandry) अहवाल विचारात घेऊन चारा डेपोसाठी गावे निश्चित केली जाणार आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन गावांची संख्या कमी अधिक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

या डेपोचे संचालन सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघ, इतर सेवाभावी संस्था, तसेच चारा छावण्या ज्या संस्था मार्फत चालवल्या जातात त्यांनाच डेपो (Fodder Depot) चालवण्यास देण्यात येणार आहेत. चाऱ्याचे नुकसान झाल्यास ती रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी डेपो चालकांकडून वसूल करावी, असा या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात 512 टन हिरवा चारा
सध्या राज्यात 512.58 टन हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. पशुधनाचा विचार करता हा चारा 15 जुलैपर्यंत पुरेल असे विभागाचे म्हणणे आहे. तसेच 144.45 टन वाळलेला चारा (Dry Fodder) उपलब्ध असून, तो 30 जूनपर्यंत पुरेल. तरीही दुष्काळी परिस्थिती विचारात घेता काही भागात चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चारा डेपो (Fodder Depot) सुरू करण्यात येणार आहेत.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.