हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात पावसाच्या आगमनाने शेतकर्यांना खरीप पेरणीचे (Kharif Season Sowing) वेध लागले असेल. जरी विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असला तरी या काळात शेतकर्यांनी पेरणी (Kharif Season Sowing) करणे योग्य होईल का? जाणून घेऊ या बाबत तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे.
राज्याच्या सर्वच भागात हळूहळू मॉन्सून (Monsoon) सक्रिय होत आहे. कोकणानंतर मॉन्सून आता मुंबईत (Mumbai) दाखल झाला आहे. 15 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Monsoon In Maharashtra) कोसळत आहे. त्यामुळे या काळात शेतकर्यांनी (Farmers) पेरणी (Kharif Sowing) करणं योग्य होईल का? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत हवामान अभ्यासक आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक (Agriculture Expert) माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. शेतकर्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय (Irrigation Facilities) असेल अशाच ठिकाणी स्वत:च्या निर्णयावरच पेरणीचे (Kharif Season Sowing) धाडस 20 जून दरम्यान करावे, असा सल्ला माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
20 जून दरम्यान करावी शेतकर्यांनी पेरणी (Kharif Season Sowing)
महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत जो काही पाऊस होईल, त्या ओलीवरच चांगल्या प्रतिच्या जमिनीत व जिथे 10 से. मी. चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजे पेर-उतार नंतर पीक रोप 30 ते 40 दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ठिकाणी, 20 जून दरम्यान पेरणी होवू शकते, असे माणिकराव खुळे म्हणाले. त्यामुळे शेतकर्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अशाच ठिकाणी स्वत:च्या निर्णयावरच पेरणीचे धाडस 20 जून दरम्यान करावे. कारण 15 जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फार सावधगिरीने, संयमाने पेरणीचे (Kharif Season Sowing) पाऊल टाकावे.
शेती कामांना वेग (Agriculture Work)
पावसा अभावी शेतीची काम खोळंबली होती. त्या कामांना आता वेग आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला काही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्यांनी पेरणी करू नये. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरू शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकर्यांवर येऊ शकते. जे आज परवडणार नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आत्ताच पेरणीची घाई करू नये. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी (Kharif Season Sowing) असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.