Green Fodder: पशुंच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे महत्व! जाणून घ्या चाऱ्याचे योग्य प्रमाण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात (Green Fodder) पशुपालन (Animal Husbandry) व दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक जोडधंदा तसेच अधिक उत्पन्न व आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. दुग्ध व्यवसायात (Dairy Business) मिळणारे उत्पादन हे पशुच्या अनुवांशिकतेवर आणि त्याला देण्यात येणार्‍या संतुलित आहारावर (Animal Fodder) अवलंबून असते.

शेतकर्‍यांमध्ये चारा पिकांच्या सुधारित वाणांच्या लागवडीबाबत असलेल्या अज्ञानामुळे बहुतेक ठिकाणी हिरव्या चाऱ्याची (Green Fodder) कमतरता 35 ते 40 टक्के पर्यंत दिसून येते.

ज्वारी, मका, बाजरी, चवळी, संकरित नेपिअर, मारवेल गवत, मद्रास अंजन, स्टायलो असा वेगवेगळ्या प्रकारचा हिरवा चारा (Green Fodder) महाराष्ट्रात आढळून येतो. जाणून घेऊ या हिरव्या चाऱ्याचे महत्व.

पशु आहारात दर्जेदार हिरव्या चाऱ्याचे महत्त्व (Importance Of Green Fodder)

  • जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे
  • हिरवा चारा चवदार व पाचक असल्याने आहारातील महत्त्वाचे घटक नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध झाल्याने जनावराचे शरीराच्या कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते व तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास उत्तम खुराक देऊन सुध्दा जनावरांचे उत्पादनक्षम वय व उत्पादन यावर विपरीत परिणाम होवू शकतो.
  • दर्जेदार हिरव्या चारा (Green Fodder) अभावी गाभण गायींना कमजोर व रोगट वासरे निपजतात.
  • आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाणे जास्त काळ राहिल्यास जनावरांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो.

जनावरांना असा द्यावा हिरवा चारा (Green Fodder)

वरील बाबींचा विचार करून पूर्ण वाढ झालेल्या जनावरास (400 किलो वजन) गाईला सरासरी 20 ते 25 किलो हिरवा चारा (निम्मा एकदल म्हणजेच मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपीअर अथवा गवते व निम्मा व्दिदल चारा म्हणजे लसुण घास, बरसीम, चवळी, स्टायलो तसेच 5 ते 6 किलो कोरडा चारा (कडबा, वाळलेले गवत, गव्हाचा भुसा, सरमाड इ.) रोज द्यावा.

त्याच बरोबर 1.5 ते 2.0 किलो खुराक, 30 ते 40 ग्रॅम खनिज मिश्रण व दिवसातून 2 ते 3 वेळेस पाणी पाजावे, चारा शक्यतो कुट्टी करून द्यावा म्हणजेच चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच चाऱ्याचे पचन चांगले होऊन चारा खाण्यासाठी लागणारी उर्जा कमी प्रमाणात लागेल.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.