Urad Variety: ‘हे’ आहेत भरघोस उत्पादन देणारे उडीद पिकाचे सुधारित वाण! जाणून घ्या वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारित वाण (Urad Variety) विकसित करून प्रसारित केले आहे. शेतकर्‍यांनी अधिकचे उत्पन्न घ्यायचे असल्यास शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. आज आपण उडीद पिकाचे भरघोस उत्पादन देणार्‍या जातीविषयी (Urad Variety) सविस्तर जाणून घेणार आहोत.

बी डी यू-1 (BDU-1)

  • हा वाण कृषी संशोधन केंद्र बदनापूर, व.ना.म.कृ.वि. (VNMKV) परभणी येथून 2001 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे.
  • हा वाण (Urad Variety) भुरी रोगास (Powdery Mildew Resistant Variety) प्रतिकारक असून महाराष्ट्रासाठी शिफारस केले आहे.
  • या वाणाचे दाणे हे मध्यम, काळया रंगाचे व टपोरे असून 100 दाण्यांचे वजन 4.5 ते 5.0 ग्रॅम एवढे असते,
  • या वाणांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 19 टक्के इतके असून 70 ते 75 दिवसांत काढणीस येते.
  • हे वाण मध्यम उंच वाढणारे असून पाने अरुंद व खोड जांभळ्या रंगाचे असते.
  • शेंगा या काळया व चोपड्या असून त्यावर कमी प्रमाणात लव असतो.
  • या वाणाचे सरासरी उत्पादन 11-12 क्विंटल प्रति हेक्टरी एवढे आहे.

टी ए यू- 1 (TAU-1)

  • हा वाण (Urad Variety) डॉ.प.दे.कृ.वि. अकोला (PDKV, Akola) व बी.ए.आर.सी मुंबई (BARC Mumbai) यांनी संयुक्तपणे 1985 मध्ये प्रसारित केला आहे.
  • हे वाण 70 ते 75 दिवसात काढणीस तयार होतो.
  • हे वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.
  • शेंग काळी व चोपडी असून दाणे मध्यम आकाराचे व काळे रंगाचे असून 100 दाण्याचे वजन 3.5 ते 3.8 ग्रॅम इतके असते.
  • या वाणांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 19 ते 20 टक्के आढळून येते.
  • सरासरी उत्पादन 10-12 क्विंटल प्रति हेक्टरी आहे.

टी पी यू-4 (TPU-4)

  • हा वाण (Urad Variety) 65 ते 70 दिवसामध्ये काढणीस तयार होते.
  • हे वाण लवकर तयार होणारे असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस केले आहे.
  • या वाणाचे दाणे काळे टपोरे आहेत.
  • प्रति हेक्टरी उत्पादन 10-11 क्विंटल प्रति हेक्टरी आहे.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.