Farmer Success Story: शेतकऱ्याने केला राज्य पातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक! ‘असे’ केले पिकाचे नियोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सांगली जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने (Farmer Success Story) राज्यात मक्याचे विक्रमी उत्पादन घेण्याचा मान मिळवला आहे. सध्या मक्याला (Maize Rate) चांगले दर मिळत असल्याने मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. मक्याचा वापर मानवी अन्न, औद्योगिक क्षेत्र, पशुखाद्य, आणि इथेनॉल निर्मितीसाठी (Maize For Ethanol Production) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात भारताने मका निर्यातीसाठी (Maize Export) चांगले पोषक वातावरण दिल्याने मक्याची निर्यात सुद्धा पाच पटीने वाढली आहे (Farmer Success Story).

मका हे खरेतर पाच महिन्यांत तयार होणारे पीक आहे. परंतु, शास्त्र शुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करून पीक घेतले तर पाच महिन्यात एकरी लाख रुपये मिळवून देण्याची क्षमता या पिकात आहे. जत, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातून शेतकर्‍यांनी (Farmer Success Story) एकरी 60 क्विंटल मका उत्पादन (Maize Record Production) ध्येय साध्य करुन दाखवले आहे.

सांगली (Sangali) जिल्ह्यातील, कवठमहांकाळ तालुक्यातील अग्रण धूळगावच्या रमेश खंडागळे (Ramesh Khandagale) यांनी राज्यातील एकरी 66 क्विंटल एवढा मका उत्पादनाचा उच्चांक केला आहे (Farmer Success Story). मका पिकाचे त्यांचे नियोजन सविस्तर जाणून घेऊ या.  

रमेश खंडागळे (Farmer Success Story) यांचे मका पिकाचे नियोजन (Maize Crop Management)

  • मका पेरणी करताना दोन ओळींत दोन फुट (60 सें.मी.) व दोन रोपात 8 इंच (20 सें.मी.) अंतर ठेवून दुचाडीने पेरणी केली तर एकरी 33 हजार रोपे मिळतात.
  • बी पेरणीपूर्वी फोरटेन्झा ड्यूयो हे कीटकनाशक 6 मि.ली. प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक व अॅझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धन 25 ग्रॅम 1 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी दोन तास अगोदर लावावे. एक एकर मका पेरणीसाठी 8 किलो बियाणे वापरावे.
  • एकरी 60 क्विंटल उत्पादनासाठी खताचा वापर फार महत्त्वाचा आहे. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी एकरी 4 टन (10 गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळण्याची गरज आहे.
  • पेरणीच्या वेळी बी पेरताना 10:26:26 हे खत एकरी 108 किलो व झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकर वापरावे.
  • त्यानंतर पीक चार पानावर असताना एकरी 33 किलो युरिया व आठ पानावर असताना एकरी 40 किलो युरिया वापरावा.
  • तुरे अवस्थेत नॅनो युरिया 100 मि.ली. फवारणी करावी.
  • मका पिकात तण नियंत्रणासाठी अँट्राटॉप 50 टक्के, एकरी एक किलो पेरणी झाल्याबरोबर 200 लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे. फवारणी करत पाठीमागे जावे.
  • मका पि‍कावर येणार्‍या कीड नियंत्रणासाठी वरील प्रमाणे बीज प्रक्रिया केल्यास 25 दिवस किडीपासून संरक्षण मिळते. 25 दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी. 45 दिवसांनी इमामेक्टिन बेन्झोएट 5 टक्के एस.जी. 80 ग्रॅम प्रति एकर शेतकऱ्यांनी फवारण्याची गरज आहे.
  • एका मक्याच्या ताटाला एक कणीस मिळते. त्या कणसातून 200 ग्रॅम दाणे मिळाले तर 66 क्विंटल उत्पादन एकरी मिळते (Farmer Success Story). म्हणून सुरुवातीला पातळ वाटले तरी पेरणीचे अंतर 2 फुट × 8 इंच ठेवावे.

मका पिकाचे उत्पादन फायदेशीर (Farmer Success Story)

  • येत्या पाच वर्षांमध्ये सरकारकडून मका उत्पादनात 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट
  • मका हे पीक इथेनॉल निर्मितीसाठी महत्त्वाचे पीक
  • मका उत्पादनाद्वारे “फार्म टू प्युल” नावाची महत्वाकांक्षी योजना राबवली जाणार आहे.
  • भारत मका निर्यातीचे केंद्र बनतोय. पाच वर्षांत निर्यातीत पाच पटीने वाढ झाली आहे.
  • 2022-23 मध्ये जवळपास 8,987 कोटींचे परकीय चलन भारताला मका निर्यातीतून मिळाले.
  • एकूण लागवडीच्या क्षेत्रात भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. मका उत्पादनात भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे.