हॅलो कृषी ऑनलाईन: एकीकडे सध्या खरीपासाठी शेतकरी सोयाबीन (Soybean Bajar Bhav) लागवडीचा विचार सुरू असताना दुसरीकडे बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. आज दिवसभरात 13 हजार 100 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 04 हजार रुपयांपासून ते 04 हजार 800 रूपयांपर्यंत सरासरी दर (Soybean Bajar Bhav) मिळत आहे. तर पिवळ्या सोयाबीनची (Soybean Market Rate) सर्वाधिक 4 हजार क्विंटलची आवक होताना दिसत आहे.
आज सर्वसाधारण सोयाबीनला (Soybean Bajar Bhav) सरासरी 4 हजार 200 रुपयांपासून ते चार हजार 450 रूपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात बार्शी बाजार समितीत 04 हजार 400 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समिती (Sambhajinagar Market Yard) 4265 रुपये, तर राहता बाजार समितीत 04 हजार 200 रूपयांचा दर मिळाला.
यानंतर लोकल सोयाबीनला सरासरी 04 हजार रुपयांपासून ते 3 हजार 300 रूपयांपर्यंत सरासरी दर (Soybean Bajar Bhav) मिळाला.
अमरावती बाजार समिती 4 हजार 300 रुपये, नागपूर बाजार समिती 4 हजार 341 रुपये, हिंगोली बाजार समिती 4 हजार 245 रुपयांचा दर मिळाला.
आज पिवळ्या सोयाबीनला (Yellow Soybean) अकोला बाजार समिती (Akola Bajar Samiti) 4290 रुपये, यवतमाळ बाजार समिती 4250 रुपये, मालेगाव बाजार समिती 4341 रुपये, पैठण बाजार समितीत चार हजार शंभर रुपये, जिंतूर बाजार समिती 4325 रुपये, गेवराई बाजार समिती 4000 रुपये, तर देऊळगाव राजा बाजार समितीत 4255 दर मिळाला.
सोयाबीनला सर्वाधिक 4900 रुपये दर हा तासगाव बाजार समितीत (Tasgaon Bajar Samiti) मिळाला.