हॅलो कृषी ऑनलाईन: कामधेनु दत्तक ग्राम’ योजना (Kamdhenu Dattak Gram Yojana) ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे (Animal Husbandry Department Maharashtra) निवडक गावांमध्ये राबवण्यात येत आहे. ज्या गावात ही योजना (Kamdhenu Dattak Gram Yojana) राबवली जातेय तेथील दुधाचे उत्पादन वाढले (Increase In Milk Production) असल्याचे दिसून आले आहे.
गावात दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी. गाय, म्हशीपालनाला (Animal Husbandry) तांत्रिक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी (Animal Care) सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावात करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात (Gondia District) कामधेनू दत्तक ग्राम योजनेतून त्या गावात पूर्वीच्या तुलनेत 20 टक्के दूध उत्पादन वाढले आहे. शेतकर्यांच्या पारंपरिक शेतीला पूरक जोड देणारा दुग्धव्यवसाय (Dairy Business) वाढविला आहे. 300 पैदास योग्य पशू असणार्या या गावांची पशु गणना करून त्या गावांची कामधेनू दत्तक ग्राम (Kamdhenu Dattak Gram Yojana) म्हणून निवड करण्यात आली.
पशुगणना करून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावाला कामधेनू दत्तकग्राम म्हणून पशुसंवर्धन विभाग स्वीकारते. ज्या गावाला दत्तक घेतले, त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे; दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल, जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधे, गोचीड, शेतकर्यांची सहल नेणे, नाविन्यपूर्ण उपक्रम, संकरित वासरांचा मेळावा घेऊन त्यांना बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, गोठा स्वच्छ करणे, चाऱ्याचे व खतांचे व्यवस्थापन करण्यात येते.
या दत्तक गावाला (Kamdhenu Dattak Gram Yojana) वर्षासाठी 1 लाख 52 हजार रुपये त्या गावाला जनावरांच्या संवर्धनासाठी देण्यात येतात. गावातील सर्वाधिक पशु मालकाला पशुमालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. तसेच त्या मंडळाची ‘आत्मा’ (ATMA) या संस्थेत नोंदणी केली जाते. शेतकर्यांचा व पशुमालकांचा आर्थिक विकास कसा होईल, यावर यातून चर्चा घडवून आणली जाते.
अधिकार्यांचा रात्री मुक्काम
कामधेनू गावातील (Kamdhenu Dattak Gram Yojana) शेतकर्यांना व पशु मालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले व त्यांचे इतर अधिकारी त्या गावात एक दिवस रात्रीचा मुक्काम ठोकतात. त्यावेळी शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ कशी करता येईल, यावर मार्गदर्शन करतात. कामधेनू गावात पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ. पटले यांनी सांगितले.