Agriculture Technology: गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष तसेच पॉलिहाऊसचे संरक्षण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे (Agriculture Technology) सर्वात जास्त नुकसान जात कशामुळे होत असेल तर ते नैसर्गिक आपत्तिमुळे (Natural Calamity). अवेळी पडणारा पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कृषी क्षेत्रात अजूनही नवनवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) विकसित होणे गरजेचे आहे.

असेच एक नवीन तंत्रज्ञान पुण्यातील (Pune) एका युवकाने विकसित केलं आहे. ज्याद्वारे गारपीट आणि अवेळी पडणारा पाऊस यापासून द्राक्ष (Grapes) तसेच पॉलिहाऊसचे (Polyhouse) संरक्षण करता येते. प्लांट आणि पॉलीहाऊस सुरक्षा मॉडेल (Plant and Polyhouse Security Model) असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे.  आणि हे तंत्रज्ञान (Agriculture Technology) विकसित करणाऱ्या युवकाचे नाव आहे महेश कोरे (Mahesh Kore).

नेमके काय आहे तंत्रज्ञान? (Agriculture Technology)

Plant and Polyhouse Security Model या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे अवकाळी पाऊस आणि गारपीटीपासून नुकसान होणार नाही. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे दरवर्षी शेतकर्‍यांना फटका बसतो, तो या तंत्रज्ञानामुळे बसणार नाही. गारा आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान (Agriculture Technology) सक्रिय होऊन संपूर्ण द्राक्षबाग आणि पॉलिहाऊस झाकते. 10 मिनिटात एक एकर क्षेत्र कव्हर होते.

शासनाकडून मदत मिळवण्यासाठी कोरे प्रयत्नशील

प्रकल्पाचे महत्व पाहून या प्रकल्पास आविष्कार 2019 संशोधन महोत्सवात 19 विद्यापीठातून महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले होते.

या प्रकल्पाला (Agriculture Technology) मदत मिळावी यासाठी महेश कोरे प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी जिल्हास्तर डी पी डी सी सोलापूर, राज्यस्तर कक्ष अधिकारी 3 अ, कृषी मंत्रालय, मुंबई तसेच सहसचिव MIDH, कृषी भवन, न्यू दिल्ली येथे प्रस्ताव पाठवले आहेत. पण हे प्रस्ताव सध्या प्रलंबित असून प्रशासकीय मान्यतेनुसार शासनाने अजून देखील निधीबाबत योग्य तो निर्णय घेतलेला नाही. तरी प्रकल्पाचे महत्त्व पाहून लवकरात लवकर केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री व पालकमंत्री सोलापूर यांनी प्रकल्पास योग्य ती मदत करावी अशी विनंती महेश कोरे यांनी केली आहे. प्रकल्प विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण निधी अंतर्गत महेश कोरे, फाउंडर डायरेक्टर, इनोव्हेशन ड्रिवन सोसायटी, पुणे हे प्रयत्नशील आहेत (Agriculture Technology).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.