Farmer Success Story: बुटक्या जातीच्या सफेद जांभळाची शेती, या शेतकर्‍यांसाठी ठरली  फायदेशीर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्वांच्या (Farmer Success Story) आवडीचे जांभूळ या फळाला (Jamun Fruit) उन्हाळा आणि पावसाळ्यात फार मागणी असते. यावर्षी तर या फळाला 800 रुपये किलोपर्यंत दर (Jamun Rate) मिळाले आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी या फळपिकाच्या लागवडीकडे वळलेले आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा शेतकर्‍याबद्दल माहिती सांगणार आहोत ज्याने पांढऱ्या जांभळाची लागवड (White Jamun) यशस्वी (Farmer Success Story) करून दाखविली आहे.  

अत्याधुनिक ‘संकेत’ या नर्सरीच्या माध्यमातून सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा विक्रांत काळे (Vikrant Kale) याने शेतकरी श्रीरामपूर – शिर्डी नजदिक असलेल्या वाकडी ता. राहता जिल्हा अहिल्या नगर पूर्वीचे अहमदनगर येथील शेतात या सफेद जांभळाची लागवड (Jamun Farming) केलेली आहे.

मित्रांसोबत चर्चा करताना एकदा विक्रांत याला थायलंडच्या (Thailand White Jamun) सफेद जांभुळाच्या (Exotic Fruit) जातीची माहिती मिळाली. आपल्याकडे देखील हे जांभूळ असावे असे त्याला मनोमन वाटले आणि मित्रांच्याच मदतीने रोपे मागवून त्याने या बुटक्या सफेद जांभळाची (Dwarf White Variety Of Jamun) लागवड केली (Farmer Success Story).  

विक्रांत यांच्या 40 एकर शेतात त्याने आंबा, पेरु, फणस, अशा विविध फळांच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली आहे. त्याने जांभळाची एक एकर क्षेत्रात 12 बाय 15 फुटांवर लागवड केली आहे. 

जून 2019 मध्ये लागवड झालेल्या या बागेतून लागवडी नंतर तिसर्‍याच वर्षी फळे यायला सुरुवात झाली. सध्या काळे यांची ही बाग चार वर्षांची असून फळांची संख्या देखील चांगली आहे (Farmer Success Story). 

पांढऱ्या जांभळाची वैशिष्ट्ये

चवीला काळ्या जांभळाच्या तुलनेत सफेद जांभूळ अधिक चांगले असल्याने खरेदीदार सफेद जांभूळ आवडीने घेतात. तसेच पारंपरिक काळे जांभूळ बाजारात येण्यापूर्वीच सफेद जांभूळ मिळत असल्याने या सफेद जांभळांना बाजारात मागणी अधिक आहे. पावसाळ्या पूर्वीच एप्रिल पासून या बुटक्या सफेद जातीच्या जांभूळ झाडांना फळे लागत असल्याने पावसाच्या वार्‍यात फळगळ होण्याची भिती या झाडांना नाही. तसेच जमिनीलगत बुटके झाड असल्याने फळांची तोड करणे देखील सहज शक्य होते.  

ज्यामुळे शेतकर्‍यांना सफेद जांभूळ शेती भविष्याच्या दृष्टीने निश्चितच फायद्याची शेती ठरू शकेल असेही विक्रांत काळे सांगतात (Farmer Success Story).

बुटक्या सफेद जांभूळ बागेचे व्यवस्थापन 

बुटक्या सफेद जांभूळ बागेच्या व्यवस्थापनेत नोव्हेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत बागेला पाण्याचा ताण दिला जातो. त्यानंतर जानेवारी मध्ये खते तसेच सॅंड फिल्टर मधून स्वच्छ केलेले पाणी झाडांच्या खोडाजवळ दोन्ही बाजूने एक एक ठिबक नळी द्वारे दिले जाते. ज्यातून पुढे मार्च मध्ये उत्तम फूल धारणा होत त्यापासून अपेक्षित फळांचे उत्पादन लक्ष साधले जाते.

कृषी क्षेत्रात विविध पर्याय उपलब्ध आहेत. गरज आहे ते फक्त डोळसपणे या संधीचा फायदा घेण्याची. विक्रांत काळे यांची ही यशोगाथा हेच सिद्ध करते की तुम्ही पिकांचा अभ्यास आणि मार्केटिंग समजून घेतल्यास निश्चितच यश (Farmer Success Story) मिळते.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.