हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात (Maharashtra)1 जूनपासून आजवर (Monsoon And Kharif Sowing) एकूण 141 मिलिमीटर अर्थात सरासरीच्या 68 टक्के पाऊस झाला असून 25 जिल्ह्यांमधील 165 तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा (Marathwada), पश्चिम विदर्भ (Vidarbha) व पश्चिम महाराष्ट्रातील (Monsoon And Kharif Sowing) तालुक्यांचा समावेश आहे.
राज्यात आतापर्यंत 33 लाख 83 हजार हेक्टर वर खरीपाची पेरणी (Kharif Sowing) पूर्ण झाली आहे. (Monsoon And Kharif Sowing) ही पेरणी सरासरीच्या सुमारे 24 टक्के इतकी आहे. मात्र, पूर्व विदर्भातील चार जिल्हे, नंदुरबार व पालघर जिल्ह्यांमधील 17 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे.
मॉन्सून (Monsoon) वेळेवर दाखल होऊनही त्या तुलनेत त्याची प्रगती झाली नव्हती. परिणामी, राज्यातील 146 तालुक्यांत 75 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच नागपूर विभागात (Nagpur Division) आतापर्यंत केवळ 2.71 टक्के तर, कोकण विभागातही (Konkan Division) केवळ 3.09 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
राज्यातील 25 ते 50 टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या 61, तर 50 ते 75 टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या 68 इतकी आहे. 75 ते 100 टक्के पाऊस 53 तालुक्यांमध्ये झाला आहे (Monsoon And Kharif Sowing).
शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले तालुके (Monsoon And Kharif Sowing)
रत्नागिरी 1
नाशिक 8
धुळे 1
जळगाव 8
नगर 13
पुणे 8
सोलापूर 11
सातारा 9
सांगली 10
कोल्हापूर 3
संभाजीनगर 9
जालना 8
बीड 11
लातूर 10
धाराशिव 8
नांदेड 5
परभणी 8
हिंगोली 1
बुलढाणा 9
अकोला 2
वाशीम 3
अमरावती 3
यवतमाळ 4
नागपूर 1
चंद्रपूर 2