Success Story: मोत्यांच्या शेतीतून इंजिनीअर तरुण करतो लाखोंची कमाई! शेतकर्‍यांनाही देतोय प्रशिक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सांगली जिल्ह्यातील एक इंजिनीअर तरुण (Success Story) मोत्यांच्या शेतीत (Pearl Farming) एक्स्पर्ट बनलेला आहे. या शेतीतून तो लाखोंची कमाई करतोच शिवाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनाही (Training For Pearl Farming) सक्षम करतोय.

इंजीनियरिंगचे शिक्षण करून नोकरी करत असताना शेतीमध्ये प्रयोग करण्याची आवड असलेला सांगली जिल्ह्यातील मयूर जगदाळे (Mayur Jagdale) हा तरूण मोती पालनातून लाखोंचा नफा कमावत आहे. मोती शेतीचे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून तो ‘मोती शेतीतील मास्टर शेतकरी’ बनला असून त्याच्याकडे देशभरातल्या विविध राज्यांतून शेतकरी प्रशिक्षणासाठी येतात (Success Story).

मयूर हा मुळचा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangali District) पलूस तालुक्यातील आंधळी हे त्याचं गाव. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात नोकरी करत असताना त्याला शेतीची आवड होती. त्यामुळे त्याने नोकरी करत असताना शेती विषयातील विविध प्रशिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर 2017-18 मध्ये मोतीपालन सुरू केले (Success Story). 

सुरुवातीला मयूरने एका टाकीपासून सुरूवात केली आणि या व्यवसायातील सखोल अभ्यास करण्यास सुरूवात केली. मोती शेतीतील विविध तंत्रज्ञान शिकून त्याने मोती शेतीसाठी मोठा प्लँट उभारला आहे. सध्या राज्यातील मोती शेतीतील अग्रगण्य शेतकरी म्हणून मयूरची ओळख आहे (Success Story).  

मोती पालनातील संधी (Opportunities In Pearl Farming)
भारतातील केवळ 2 टक्के नागरिक मोत्यांची शेती करतात. शिंपल्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे सौंदर्य प्रसाधनामध्ये (Pearl Facial) उपयोग केला जातो. तर एक मोती (प्रक्रिया न केलेला) 100 रूपयांना विक्री होतो. तर हाच मोती वेगळे तंत्रज्ञान वापरून तयार केला असेल तर तो मोती 200 रूपयांना विक्री होतो. मोती 100 वर्षे ठेवला तरी खराब होत नाही. त्यामुळे मोती पालनामध्ये खूप संधी असल्याचे मयूर सांगतो. 

कसे केले जाते मोतीपालन?
शिंपले हे मुळात सजीव असल्यामुळे आणल्यानंतर पाण्यात 10 ते 15 दिवस ठेवावे लागतात. यासाठी तीन टाक्या बनवाव्या लागतात. प्री टँक, पोस्ट टँक आणि मेन टँक. पहिल्या टाकीत सेट झालेल्या शिंपल्यावर सर्जरी करून ते शिंपले पोस्ट टँकमध्ये ठेवले जातात. त्यानंतर पोस्ट टँकमध्ये काही शिंपले मरतात आणि उरलेले शिंपले पुढील दीड वर्षासाठी मेन टँकमध्ये शिफ्ट केले जातात. त्यानंतर फक्त पाणी तपासणे, त्यांना खाद्य देणे आणि आठवड्यातून एकदा 25 टक्के पाणी बदलणे एवढेच काम असते.

सौंदर्य प्रसाधनाचीही विक्री (Pearl Uses In Cosmetics)

मयूर हा मागणीनुसार मोती तयार करतो. वेगवेगळ्या देवीदेवतांच्या फोटोही मोतीपासून तयार केले जातात. प्रक्रिया न केलेल्या मोत्यांपासून मयूर वेगवेगळ्या वस्तू बनवून तोही विक्री करतो.

प्रशिक्षणातून 7 ते 8 लाख
मयूरने मोती पालनातील बारकावे जाणून घेतल्यामुळे तो यामध्ये एक्स्पर्ट झाला आहे. तर त्याच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातली शेतकरी आले आहेत. आतापर्यंत त्याने जवळपास 200 लोकांना यशस्वी रित्या मोती पालनाचे प्रशिक्षण दिले असून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या शेतकर्‍यांकडून तो मोती विकतही घेतो. प्रशिक्षणातून तो दरवर्षी 7 ते 8 लाखांचे उत्पन्न मिळवतो (Success Story).  

मोती पालनातून कमाई

मयूरकडे मोती पालनाच्या दोन टाक्या आहेत. यामध्ये प्रत्येकी 3 हजार शिंपले ठेवले जातात. या माध्यमातून त्याला एका टाकीतून वर्षाकाठी 7 ते 8 लाखांचे उत्पन्न (Success Story) निघते असे मयूर सांगतो. प्रशिक्षण आणि मोती पालनातून प्रत्येक वर्षाला मयूर 17 ते 18 लाखांचे उत्पन्न कमावतो.

मोती पालनाबद्दल अनेक शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी चांगले उत्पन्न देणार्‍या मोती पालनाकडे वळावे असे मत मयूर व्यक्त करतो.

मोती पालनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून मयूर महाराष्ट्रातील मोती पालनातील बादशाह बनला आहे. शेतकऱ्यांना उत्तम पद्धतीने प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे मयूरचे ध्येय आहे.