Animal Shed: पावसाळ्यात जनावरांचा गोठा सुस्थितीत ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा अवलंब!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या पावसाळ्याचे दिवस असून जनावरांसाठी योग्य निवाऱ्याची (Animal Shed) व्यवस्था करणे आवश्यक असते. यासाठी घराला लागून जनावरांचा गोठा सुस्थितीत करून घेतला जातो. कुठे पाणी गळतंय का? जमिनीवर मुरूम टाकून सपाट करणे असो, ही कामे केली जातात. जनावरांचा गोठा (Animal Shed) व्यवस्थापनाचा दूध उत्पादनावर (Milk Production) सुद्धा परिणाम होतो. जनावरांना पावसाळ्यात (Rainy Season) सुरक्षित आणि उबदार जागा मिळणे गरजेचे आहे. या काळात गोठ्याचे व्यवस्थापन कसे करावे जाणून घेऊ या.

पावसाळ्यात गोठ्याचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करा (Animal Shed Management)

  • गोठ्यामध्ये पाणी गळत असेल तर वेळीच डागडुजी करावी.
  • गोठ्यात हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
  • गोठ्यामध्ये (Animal Shed) स्वच्छता ठेवावी, जेणेकरून लघवी व शेणावाटे निघणारे अमोनिया मिथेन वायूमुळे जनावरांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही.
  • वारा, थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य निवारा असावा.
  • गाभण गाई, म्हशींची योग्य व्यवस्था करावी (Cattle Shed),  त्यांना बसण्यासाठी आरामदायी व उबदार जागा असावी. शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे.
  • पावसाळ्यात जमीन ओली, भुसभुशीत झाल्यामुळे जनावर घसरून त्यांना इजा होऊ शकते त्यामुळे वेळोवेळी जमीन कोरडी होईल याची काळजी घ्यावी.
  • दगड व माती खुरांमध्ये जाऊन बसल्यामुळे जनावरांना जखमा होतात. यासाठी खुरांची नियमित तपासणी करावी. पावसाळ्यात ओलसरपणामुळे खूर खराब झाल्यास त्या वेदनांमुळे दुभत्या गाई, म्हशींच्या उत्पादनावर परिणाम होतो.
  • हिरव्या चाऱ्याकरिता ज्वारी, बाजरी, मका, यासारखे पिकांना प्राधान्य द्यावे. याचबरोबर बहुवार्षिक पिकांमध्ये यशवंत, मेथीघास यासारखी पिके घ्यावीत.

पावसाळ्यातील शेळीच्या गोठ्याचे व्यवस्थापन (Goat Shed Management)

पावसाळ्यामध्ये पश्चिमेकडून पाऊस व वारा वाहतो, त्यानुसार शेळ्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गोठ्यात (Animal Shed) आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. शेळ्यांना ठेवण्यासाठी वेगवेगळी दालने असावी ज्यामुळे आजारी शेळ्या, पिले, गाभण शेळ्या व बोकड वेगवेगळे ठेवता येतील. शेळ्यांना आवश्यक तेवढी जागा द्यावी, जेणेकरून गर्दी होणार नाही. पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा, तसेच शेडमधील जमिनीवरही चुना भुरभुरावा.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.