हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, (Farmers Success Story) आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रात सफरचंदाची लागवड याविषयी अनेक यशोगाथा ऐकल्या किंवा वाचल्या असतील. परंतु जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणात येणारी लालचुटुक रेड वॉटर सफरचंदाची (Red Water Apple) लागवड महाराष्ट्रातील एका शेतकर्याने यशस्वी (Farmers Success Story) करून दाखविली आहे.
धुळे जिल्ह्यातील (Dhule Farmers) शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे जयवंत पाडवी (Jayawant Padavi). रेड वाटर सफरचंद लागवडीची ही किमया साध्य झाली ते जयवंत पाडवी यांच्या कौतुहलातून. त्यांनी लावलेली रेड वाटर सफरचंदाची बाग सध्या बहरात आली आहे (Farmers Success Story).
परदेशातील स्ट्रॉबेरी (Strawberry) महाबळेश्वरला येते, मग आपल्या शेतात का येणार नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, दुष्काळी तालुक्यातील उपक्रमशील शेतकर्यांनी पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना विविध फळबागा घेतल्या. जयवंत पाडवी यापैकीच एक प्रयोगशील शेतकरी आहेत. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या फळबागांचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. मात्र, रेड वॉटर सफरचंद लागवडीचा प्रयोग आपल्या भागात करायचा, असा चंगच पाडवी यांनी बांधला. त्यासाठी त्यांनी गुगल, युट्यूबवर बराच काळ रेड वॉटर सफरचंदाच्या (पाणी सफरचंद) शेतीचा अभ्यास केला (Farmers Success Story).
तर रेड वॉटर सफरचंदाची लागवड डिसेंबर महिन्यात करावी, असा त्यांना हिमाचल प्रदेशातील शेतकर्यांनी सल्ला दिला. गेल्यावर्षी ग्रामीण भागात आंध्र प्रदेशातील विक्रेते फळझाडे व फुलझाडे विक्रीसाठी आले असता पाडवी यांनी त्यांना रेड वॉटर सफरचंदाबाबत सांगितले. त्यानुसार तेथील विक्रेत्यांशी संपर्क करून त्यांनी तेथील रोप वाटिकेतून रेड वॉटर सफरचंदाची रोपे (Red Water Apple Plant) उपलब्ध करून दिली. आपल्या परिसरात ही फळे येत नाहीत, असे बऱ्याच स्थानिक शेतकर्यांनी त्यांना सांगितले. पण त्यांनी सर्वांनी दिलेला सल्ला बाजूला ठेवत मोठ्या धाडसाने ऐन उन्हाळ्यात रोपांची लागवड केली. युट्यूब, शेतकर्यांच्या मार्गदर्शनातून झाडांची चांगली निगाही राखली (Farmers Success Story).
एका झाडापासून आठ ते दहा किलो सफरचंद
दरम्यान लागवडीनंतर 11 ते 13 महिन्यांनी रेड वॉटर सफरचंदाच्या झाडाला फळधारणा झाली आहे. सातपुड्यातील डोंगरात उमर्दा येथे सध्या लालचुटुक रेड वॉटर सफरचंद फुलली आहेत. सुमारे 100 ग्रॅम वजनाची सफरचंदे झाडांना लागली आहेत. फळांची गोडी (Red Water Apple Taste) देखील चांगली आहे. यंदा एका झाडापासून अंदाजे आठ ते दहा किलो रेड वॉटर सफरचंद मिळाली (Farmers Success Story).
पाडवी यांनी अर्धा एकर क्षेत्रात फणसाची झाडे लावली आहेत. पाडवी यांनी पारंपरिक शेती न करता यापूर्वीही वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांनी शेती विषयक अनेक प्रयोग केले. त्यामधील काही यशस्वी झाले, तर काहीत नुकसानही सोसावे लागले आहे. हे रेड वॉटर सफरचंद बाजारात उपलब्ध झाल्यानंतर लाखोंचा नफा (Farmers Success Story) होणार असल्याचे ते म्हणाले.
उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकर्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग (Farmers Experiment In Agriculture) केले पाहिजेत. आपल्याकडे पोषक वातावरण नसल्याने रेड वॉटर सफरचंदाची लागवड केली जात नाही. मात्र, शेतीत रेड वॉटर सफरचंद लागवडीचा प्रयोग करायचाच, अशी खूणगाठ बांधून लागवड केली. ती यशस्वीही ठरली (Farmers Success Story).
निर्धाराने रेड वॉटर सफरचंदाची शेती करणाऱ्या जयवंत पाडवी यांच्या जिद्दीला सलाम!