Niger Crop: प्रतिकूल परिस्थितीतही तग धरणाऱ्या ‘कारळा’ पिकाची लागवड करा, जास्त नफा कमवा!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीपात काही पिकांचे (Niger Crop) अति पावसामुळे नुकसान होते तर काही पिके तग धरून राहतात. असेच एक पीक म्हणजे कारळा. हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक खरीप तेलबिया पीक (Kharif Oilseed Crop) आहे. त्यामध्ये 35 ते 40 टक्के तेल असते. वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त असणारे हे कारळ्याचे पीक (Niger Crop) शेतकर्‍यांनी मात्र पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे.

कारळ्याचे उपयोग (Niger Crop Benefits And Uses)

  • कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल (Niger Edible Oil) म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो.
  • कारळ्याच्या पेडींचा वापर जनावरांना खाद्यपेंड (Animal Feed) म्हणून करतात. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी या पेंडीचा वापर केला जातो. कारण या पेंडीमध्ये 37 टक्के प्रथिने, 26 टक्के कर्बोदके आणि 4.58 टक्के खनिजे असतात. तसेच या पेंडीचा वापर सेंद्रिय खत (Organic Manure) म्हणूनही केला जातो. या पेंडीमध्ये 5 टक्के नत्र, 2 टक्के स्फुरद, व 1.5 टक्के पालाश असते.
  • कारळा बी (Niger Seeds) स्वादिष्ट चटण्या (Karala Chutney) आणि खमंग मसाल्यामध्ये वापरण्यात येते.
  • बहुपीक पद्धतीमध्ये मधमाशा आकर्षित करणारे (Honeybee Attracting Plants) व किडींना परावृत्त करणारे पीक (Niger Crop) आहे.

कारळा पिकाची लागवड (Niger Crop Cultivation)

या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वरकस उताराच्या आणि साधारण प्रतिच्या जमिनीवर घेतली जाते. विशेषतः खरीप हंगामात कोरडवाहू पीक (Rainfed Crop) म्हणून या पिकाचा आजवर विचार केला आहे. पीक वाढीसाठी लागणार्‍या अन्य घटकांचा किंवा सेंद्रिय खतांचा या पिकासाठी वापर केला जात नाही.

हे पीक (Niger Crop) खूप दाट पेरल्यास खरीप हवामानात उंच वाढते, फांद्या कमी फुटतात. त्यामुळे कारळ्याचे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कारळा हे पीक खरीप व रब्बी हंगामात घेता येते. जादा पावसात तग धरते शिवाय पाण्याचा ताणही सहन करते. प्रतिकूल परिस्थितीत पिकाची चांगली वाढ होते.

जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्येही पीक उत्तम येते. या पिकामध्ये (Niger Crop) अवर्षण प्रतिकारक (Drought Resistant Crop) शक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यात या पिकाची चांगली वाढ होते. या पिकास रोग, किडींचा (Disease And Pest Resistant Crop) विशेष प्रादुर्भाव होत नाही. उग्र वास असल्यास भटक्या गुरांचा त्रास पण कमी होतो.

उत्पन्न व शेत सुशोभिकरण
कारळ्याची पिवळी फुले 20 ते 25 दिवस टिकून राहतात. या गुणधर्माचा वापर करून शेतजमीन सुशोभित करण्यासाठी या पिकाची लागवड उत्तम ठरते. तृणधान्ये, भाजीपाला पिकांमध्ये आंतरपीक म्हणून या पिकाची (Niger Crop) लागवड करणे शक्य आहे. या पिकांच्या भोवती लागवड करावी.

पक्ष्यांचा या पिकास बिलकूल त्रास होत नाही. या पिकाची फूलधारणा झाल्यावर आकर्षित होतात. त्यामुळे शेतातील इतर परपरागसिंचित पिकांमध्ये परागीभवन जास्त प्रमाणात होते.

पिकाची फुले सुकून बोंडे काळी झाली की, कापणी करावी.