Maize Market: पुढील तीन महिने कसे असतील मक्याचे बाजारभाव? जाणून घ्या बाजाराचे हाल! 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे समजले जाणाऱ्या मका (Maize Market) या अन्नधान्य पिकाचे अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन (Maize Producing Countries) घेतले जाते. भारतात मक्याचा वापर हा मुख्य पोल्ट्रीवर (Poultry) खाद्य पशुखाद्य  (Animal Feed) यासाठी केला जातो. मक्याचा वापर सध्या इथेनॉल निर्मितीसाठी (Maize For Ethanol Production) सुद्धा करण्यात येत आहे. भारतात मक्याची (Maize Market) मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणार्‍या बदलाचा मक्याच्या किमतीवर (Maize Rate) परिणाम होत असतो. 

बाजारात मक्याला (Maize Market) पुढचे तीन महिने म्हणजे जुलै ते सप्टेंबर काय भाव मिळणार ते समजून घेऊ या. जगातील मका उत्पादनाचा विचार केला तर 2022-23 साली 11 लाख 445 मेट्रिक टन उत्पादन झाले होते. 

तर 2023-24 मध्ये 12 लाख 145 मेट्रिक टन उत्पादन झाले. त्यानंतर भारताचा विचार केला तर भारतात मागील वर्षी म्हणजे 2022-23 यावर्षी मक्याचे उत्पादन (Maize Production) 125 लाख मेट्रिक उत्पादन निघाले होते. तर केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार देशात सन 2023-24 मध्ये मक्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मका निर्यात आणि महाराष्ट्रातील उत्पादन (Maize Market)

भारतातील मका निर्यात (Maize Export) 2023-24 यावर्षी जवळपास 36 लाख मेट्रिक टन इतकी निर्यात झाली आहे. तर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मका निर्यात 2023-24 मध्ये 36 लाख टनांची वाढ होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील मक्याचे उत्पादन पाहिले असता 2022-23 मध्ये 12 लाख मेट्रिक टन इतके उत्पादन होते. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात खरीप 2023-24 मध्ये मक्याच्या उत्पन्नात घट होईल असा अंदाज आहे. भारत सरकार कृषी विभागाच्या माहितीनुसार 2023-24 च्या खरीप हंगामात भारतात मक्याचे लागवड क्षेत्र 82.6 लाख हेक्टर व्यापले जाणार असल्याची संभावना आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 1.89 टक्के अधिक आहे. 

जुलै सप्टेंबर महिन्यात बाजार कसा असेल? (Maize Market Prediction)

तर महाराष्ट्रातील नांदगाव बाजारात (Maize Market) मागील तीन वर्षातील मक्याच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यातील सरासरी किमती बघितल्यास जुलै ते सप्टेंबर 2021 मध्ये साधारण 1774 रुपये प्रति क्विंटलला दर होता. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर 2022 मध्ये 2157 रुपये प्रति क्विंटल दर होता. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये 2082 रुपये प्रति क्विंटल दर होता. दुसरीकडे खरीप हंगाम 2023-24 साठी मका पिकाचे आधारभूत किंमत ही 2090 प्रति क्विंटल इतकी आहे. आणि यंदा म्हणजे जुलै ते सप्टेंबर 2024 महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किंमत ही 2100 रुपये ते 2600 रुपये प्रति क्विंटल इतकी शक्यता वर्तविण्यात येत आहे.