Quality Improvement In Fodder: वाळलेला निकृष्ट चारा होईल गुणवत्तापूर्ण; करा या पद्धतींचा अवलंब!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: निकृष्ट दर्ज्याच्या चाऱ्यामुळे (Quality Improvement In Fodder) पशुधनाची क्रयशक्ती, दूध उत्पादन (Milk Production) यावर विपरीत परिणाम होत असतो. पशुधनास (Livestock Fodder) जो चारा खाण्यास दिला जातो, त्यात प्रामुख्याने हिरवा चारा (Green Fodder), वाळलेला चारा (Dry Fodder), गव्हाचा, भाताचा, तुरीचा , व ज्वारीचा भुसा, किंवा सोयाबीनचे काड, खुराक म्हणून पेंड यांचा समावेश केलेला आहे. परंतु हल्ली हिरवा वाळलेला चारा व पेंड इत्यादींच्या किमतीमध्ये खूप वाढ झालेली आहे. यासाठी उपलब्ध निकृष्ट चाऱ्यावरच प्रक्रिया करून ते गुणवत्तापूर्ण (Quality Improvement In Fodder) करता येते. जाणून घेऊ या प्रक्रियेबद्दल सविस्तर.

निकृष्ट चारा गुणवत्तापूर्ण करायचे उपाय आणि होणारे फायदे

  • निकृष्ट वाळलेले गवत, गव्हाचे काड, सोयाबीनचा भुसा, वाळलेली वैरण साठवून ठेवून त्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चारा पासून उत्कृष्ट व सकस चारा तयार करून (Quality Improvement In Fodder) जनावरांना देता येऊ शकतो. या प्रक्रियेतून चाऱ्याची पाचकता वाढते. तसेच चाऱ्याची गरज भागवता येते. 
  • पीक कापणीच्या वेळीच बदल घडविणे किंवा त्यात जैविक बदल घडविणे, काडा सोबत प्रथिने व ऊर्जा समृद्ध अन्न घटकांचा समावेश करून जनावरांना खाऊ घातल्यास अधिक फायदा होतो. उदा. 200 किलो वजनाच्या जनावराला आपण गव्हाच्या काडा सोबत चार किलो खुराक दोन किलो व हिरवे गवत दोन किलो दिल्यास अधिक फायदेशीर राहते.
  • पशुधन जर दूध देणारे असेल तर काडाची कुट्टी सहा किलो व खुराक सहा किलो याप्रमाणे दिल्यास दूध उत्पादनामध्ये फायदा होतो.
  • काडाला भौतिक प्रक्रिया केल्यास त्याची पचनशक्ती वाढते. उदा. चारा कुट्टी, काडाची कुट्टी केल्यास ते अधिक पचनीय होते. जनावरे ते अधिक प्रमाणात खातात तसेच कडबा कुट्टी केलेले काड जर पाण्यामध्ये रात्रभर भिजवले किंवा खाऊ घालण्याचा दोन तास अगोदर भिजवले तर जनावरे ते अधिक प्रमाणात खातात व खाल्ल्यानंतर अधिक ऊर्जा प्राप्त करून देतात.
  • कमी प्रतिच्या चाऱ्यासोबत युरिया, मळी, क्षार मिश्रण एकत्रित करून त्याची वीट तयार केल्यास व ते चाटण म्हणून जनावराला उपलब्ध करून दिल्यास पशुधन निकृष्ट प्रतिचा चारा 15 ते 30 टक्के जास्त खातात. ज्यामुळे खुराकाची आवश्यकता कमी होते व पशुधनाच्या वजनामध्ये दैनंदिन वाढ होते. दुधाचे उत्पादन 15 ते 20 टक्के वाढू शकते.
  • निकृष्ट वाळलेले गवत, गव्हाचे काड, सोयाबीनचा भुसा, तसेच वाळलेली वैरण साठवून त्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चारा पासून उत्कृष्ट व सकस चारा तयार करून (Quality Improvement In Fodder) जनावरांना देता येऊ शकतो. वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण एक ते दीड टक्के असते. युरिया प्रक्रिया केल्याने प्रथिनांचे प्रमाण आठ ते नऊ टक्के पर्यंत वाढते. चाऱ्याची पाचकता वाढते. चारा टंचाईच्या (Fodder Shortage) काळात टाकाऊ चारा उपयोगात आणून चाऱ्याची गरज भागवता येते. 

वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे साहित्य
१) वाळलेला चारा 100 किलोग्रॅम 
२) युरिया 1.5 ते 2 किलोग्रॅम 
३) कमी प्रतिचा गूळ 3 किलोग्रॅम 
४) क्षार मिश्रण 1 किलोग्रॅम 
५) खडे मीठ 1 किलोग्रॅम 
६) पाणी 20 लिटर

चाऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत (Quality Improvement In Fodder)

वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी (Kadba Kutti) करून घ्यावी. 100 किलो चाऱ्याच्या कुट्टीसाठी दीड ते दोन किलो युरिया 20 लिटर पाण्यात विरघळून तयार झालेल्या द्रावणात 1 किलोग्रॅम मीठ व 3 किलोग्रॅम गूळ मिसळून ढवळून एकजीव करावे. फरशीवर किंवा चवाळ्यावर चाऱ्याच्या कुट्टीचा पंधरा सेंटीमीटर थर घेऊन त्यावर द्रावण शिंपडावे, त्यावर क्षार मिश्रण टाकावे.

कुट्टी वर खाली करून चांगले मिसळावे अशाप्रकारे कुटीचे एकावर एक थर देऊन त्यावर तयार केलेले द्रावण व क्षार मिश्रण टाकून मिसळावे. प्रक्रियायुक्त कुट्टी दाबून त्यातील हवा बाहेर काढून टाकावी. त्यावर प्लास्टिक कागद झाकून हवा बंद करावे. प्रक्रियायुक्त कुट्टी चारा 21 दिवसानंतर पशुधनास (Animal) खाण्यात देण्यात यावा. 

प्रक्रिया युक्त कुट्टी वापरताना घ्यावयाची काळजी

  • प्रक्रियेसाठी आवश्यक युरिया काळजीपूर्वक योग्य प्रमाणात मोजून घ्यावा.
  • युरियाचे प्रमाण दीड व दोन टक्के पेक्षा जास्त नसावे.
  • युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळेल याची दक्षता घ्यावी.
  • प्रक्रियायुक्त कुट्टी 21 दिवसानंतरच जनावरांना खाण्यास देऊ शकता.
  • प्रक्रिया करण्याची जागा स्वच्छ टणक आणि पाऊस दलदल यापासून संरक्षित असावी.
  • प्रक्रिया करते वेळेस गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी. 

प्रक्रियायुक्त कुट्टी देण्याचे प्रमाण

प्रक्रियायुक्त कुट्टी सुरुवातीला जनावरांना एक ते दीड किलो प्रमाणात देऊन पंधरा दिवसापर्यंत वाढवत नेऊन एका जनावरास चार ते पाच किलोग्रॅम पर्यंत प्रतिदिन द्यावी. सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या वासरांना व रवंथ करणारे लहान प्राणी शेळ्या मेंढ्यांना देऊ नये.

प्रक्रिया कुट्टी वापरण्याचे फायदे (Benefits Of Kadba Kutti)

  • प्रक्रियायुक्त कुट्टी (Quality Improvement In Fodder) वापरल्यास होणारा खर्च कडबा पेक्षा कमी असतो, त्यामुळे चाऱ्यावरील खर्चात बचत होते.
  • वाया जाणारे सुके गवत गावाचे काड याचा वापर केल्याने वैरणीची बचत होते.
  • जनावरांच्या पोटातील खाद्याचे पचन करणाऱ्या जीवाणूंच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे जनावरांची भूक वाढते व एकूण पचने पदार्थ अधिक प्रमाणात मिळतात.
  • दूध उत्पादनात वाढ प्रक्रिया केलेले काड, गवत कडबा तुलनेत जास्त पौष्टिक असते. प्रक्रियेमुळे प्रथिनांचे प्रमाण 4 टक्के पर्यंत आणि एकूण पचनीय पदार्थाचे प्रमाण 42 टक्के पासून 56% पर्यंत वाढते, यामुळे दूध (Milk) उत्पादनात वाढ होते.