हॅलो कृषी ऑनलाईन: तूर (Tur Crop) हे भारतातील एक महत्त्वाचे कडधान्य पीक (Pulses Crop) आहे. हे पीक सलग किंवा मुख्यत: आंतरपीक (Tur As Intercrop) म्हणून इतर पिकात घेतले जाते. परंतु अनेकदा या पिकाच्या उत्पादनात घट येते. तूर पिकामध्ये वेळोवेळी काही गोष्टींचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ (Tips To Increase Production) करता येते. या लेखात तूर पिकात (Tur Crop) वेगवेगळ्या अवस्थेत काय उपाययोजना करायच्या ते जाणून घेऊ या.
तूर पिकाच्या ओळींमध्ये खांडण्या
दोन झाडांतील अंतरानुसार मजुरांद्वारे खांडण्या भरणे आवश्यक आहे. काही ठिकाणी डोबणी 2-3 वेळा करून खांडण्या बुजवणे आवश्यक आहे.
निंदणी
ट्रॅक्टर किंवा बैलजोडीने पेरणी केलेल्या तूर पिकाची (Tur Crop) निंदणी (Hand Weeding) वेळीच करणे आवश्यक आहे. सोयाबीनसोबत आंतरपीक असल्यास सोडओळ (पट्टापेर) पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
शेंडे छाटणे
पीक 25 ते 30 दिवसांचे असताना शेंडे छाटून घ्यावेत. अलीकडे शेंडे छाटण्याची सुरक्षित अशी छोटी यंत्रे उपलब्ध आहेत. छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी (Fungicide Spraying) करणे आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापन
शेवरा अवस्थेपूर्वी आणि शेंगांमध्ये दाणे भरताना ओलीत करणे आवश्यक आहे. जमिनीत मुबलक ओल असल्यासच शेंडे छाटणे आवश्यक आहे.
रोग आणि किडींचे नियंत्रण
शेवरा अवस्थेच्या सुरुवातीला, फुलोरा अवस्थेच्या सुरुवातीला आणि शेंगांमध्ये दाणे भरताना योग्य कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे.
इतर महत्त्वाच्या गोष्टी
- सलग तूर लागवडीसाठी (Tur Cultivation Method) जोडओळ पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
- बीटी कपाशी आणि तूर यांच्यातील आंतरपीक पद्धतीमध्ये दोन्ही पिकांची जोडओळ पद्धतीने पेरणी करणे आवश्यक आहे.
- योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते आणि सूक्ष्मसंजीवके देणे आवश्यक आहे.
- योग्य वेळी आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून काढणी करणे आवश्यक आहे.
या गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला तुमच्या तूर पिकाचे (Tur Crop) उत्पादन (Production) निश्चितच वाढवता येईल.