Union Budget 2024 Highlights: केंद्रीय बजेट मधील महत्त्वाच्या घोषणा! जाणून घ्या तुमच्यासाठी काय आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024 Highlights) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला आहे. मोदी सरकार (Modi Government) तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प (Union Budget) संसदेत सादर होत आहे. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024 Highlights) सामान्य जनतेसाठी काय घेऊन आलेला आहे जाणून घेऊ या थोडक्यात.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे (Union Budget 2024 Highlights

  • 2 लाख कोटी रूपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रम.
  • शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रूपयांची तरतूद.
  • पहिल्यांदा जे नोकरीसाठी पात्र असणार आहेत त्यांना 15 रूपयापासून पुढे पगार देण्यात येणार.
  • देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रूपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत.
  • मुद्रा कर्ज 10 लाख रूपयांवरून 20 लाख रूपयांपर्यंत दुप्पट केले जाईल.
  • पंतप्रधान आवास योजनेलाही (PM Awas Yojana 2024) मुदतवाढ, पीएम आवास योजनेंतर्गत तीन लाख नवीन घरे बांधण्यात येणार.
  • उत्पादन क्षेत्रातील रोजगार निर्मितीला प्रथमच प्रोत्साहन देण्यात येणार. याचा 30 लाख तरुणांना फायदा होईल आणि सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगाराचा अंतर्भाव होईल.
  • पीएम आवास योजना शहरी अंतर्गत, शहरांमध्ये राहणार्‍या 1 कोटी गरीबांना 10 लाख कोटी रुपये खर्चून घरे दिली जातील. पुढील पाच वर्षात 2.5 लाख कोटी रूपयांची केंद्रीय मदत दिली जाणार आहे.
  • देशभरातली एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज(Free Electricity).
  • नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येतील
  • देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात येणार
  • देशभरात रस्तेबांधणीसाठी 26 हजार कोटींचा खर्च केला जाईल
  • 5 वर्षांच्या काळात 20 लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उद्योग विश्वाच्या गरजांनुसार तयार केला जाई
  • नव्या कररचनेत 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
  • पेन्शनची मर्यादा 15 हजारांवरून 25 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होईल.
  • सोनं व चांदीसाठी 6 टक्के तर प्लॅटिनमसाठी 6.5 टक्के कस्टम ड्युटीत घट
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.