Sugarcane FRP: एफआरपीची रक्कम थकवल्याने ‘या’ 7 साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून कारवाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीची रक्कम (Sugarcane FRP) मिळालेली नाही. साखर गाळप हंगाम संपून अडीच महिने उलटले तरीही अजून काही साखर कारखान्यांनी (Sugar Factory) एफआरपीची रक्कम दिलेली नाही. म्हणून साखर आयुक्तालयाने (Sugar Commissionerate) या कारखान्यांवर कारवाई केली आहे. आयुक्तालयाकडून 11 साखर कारखान्यांवर आरआरसीची (RRC) कारवाई करण्यात आली होती. पण 15 जुलै अखेरपर्यंत 4 साखर कारखान्यांनी एफआरपीची (Sugarcane FRP) रक्कम दिली असून सध्या 7 साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, शेतकर्‍यांच्या शेतातून (Sugarcane Farmers) ऊस तुटून गेल्यानंतर 15 दिवसांच्या आत एफआरपी रक्कम (Sugarcane FRP) शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणे आवश्यक असते. पण बरेच साखर कारखाने पैसे देण्यासाठी उशीर करतात. म्हणून साखर आयुक्तालय या कारखान्यांवर RRC (Revenue Recovery Certificate) अंतर्गत कारवाई करते. साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांसाठी दिलेला हा निर्वाणीची इशारा समजला जातो.

सदर कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी कारखान्यांकडून थकीत रक्कम वसूल करत असतात. तरीही कारखान्यांनी एफआरपीची रक्कम (Sugarcane FRP) न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येते. पण ऊस तुटून गेल्यानंतर दोन महिने पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो.

कारवाई करण्यात आलेले साखर कारखाने
1) मातोश्री लक्ष्मी शुगर कोजनरेशन इंड. लि. रूद्देवाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर

2) विठ्ठल रिफाईंड शुगर्स लि. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापूर

3) श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि. आदिनाथनगर, शेलगाव, भाळवणी, पो. जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर

4) गोकुळ शुगर्स लि. (श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाने लि.) नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
5) कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखाना लि. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
6) भीमाशंकर शुगर मिल्स लि. मु. पो. पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव
7) जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.