Arka Nikita Okra: अर्का निकिता – लागवडीस अनुकूल, संकरित भेंडीची वैशिष्ट्यपूर्ण जात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अर्का निकिता GMS-आधारित भेंडीचा (Arka Nikita Okra) पहिला संकरित वाण आहे जो भारत आणि जगातील सार्वजनिक संस्थांनी विकसित केला आहे. ही भेंडीची संकरित जात (Arka Nikita Okra) 2017 मध्ये VTIC (Varity Technology Identification Committee) संस्थेने शोधून प्रसारित केलेली आहे.

लवकर फुलधारणा होणार्‍या या जातीत (Okra Variety) फुले येण्यासाठी 39 दिवस आणि फळे येण्यासाठी 43 दिवस लागतात. या जातीची फळे गडद हिरवी, मध्यम, गुळगुळीत आणि कोवळी असतात. या जातीत पौष्टिकदृष्ट्या जास्त अँटिऑक्सिडेंट आणि उच्च दर्ज्याचे फायबर (8.85%) असतात. यात  पोटॅशियम 3.7%, कॅल्शियम 997 mg/100 ग्रॅम सारखे खनिजे आहेत. ही जात 125-130 दिवसांच्या कालावधीत तोडणीला तयार होत असून उत्पादन 21-24 टन मिळते.

अर्का निकिता (Arka Nikita Okra) ही भेंडीची जात उच्च उत्पादकता (High Production) आणि शेतीसाठी अनुकूलता यासाठी ओळखली जाते. पारंपारिक शेती पद्धतींसह आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड याद्वारे या जातीचे लक्षणीय उत्पादन घेता येते. अर्का निकिता ही भेंडीची जात तिच्यातील अपवादा‍त्मक गुणधर्मांसाठी ओळखली जाते जसे, उच्च उत्पन्न, रोग प्रतिकारशक्ती आणि विविध हंगामात आणि प्रदेशांमध्ये लागवडीस अनुकूलता.

अर्का निकीता भेंडीची प्रमुख वैशिष्ट्ये (Arka Nikita Okra Features)

उच्च उत्पादन: अर्का निकिता प्रति हेक्टर 21-24 टन इतके प्रभावी उत्पादन देते. या उच्च उत्पादकतेमुळे शेतकर्‍यांसाठी जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी एक चांगली निवड ठरते.

फळांची गुणवत्ता: या संकरीत भेंडीची फळे गडद हिरवी, गुळगुळीत पाच कड्यांची असतात. यामुळे ही भेंडी दिसायला आकर्षक तर आहेच शिवाय काढणीस सोपी आहे. कोवळी फळे यामुळे या जातीला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो.

अनुकूलता: अर्का निकिता विविध प्रकारच्या परिस्थितीत लागवडीसाठी योग्य आहे. या जातीची खरीप (पावसाळा) आणि रब्बी (हिवाळा) दोन्ही हंगामात लागवड करता येते. ही जात कर्नाटक, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, हरियाणा, महाराष्ट्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह संपूर्ण भारतातील प्रमुख भेंडी-उत्पादक प्रदेशांसाठी अनुकूल आहे.

रोग सहनशील: ही संकरित जात (Arka Nikita Okra) भेंडी पिकातील हानिकारक यलो व्हेन मोझॅक व्हायरस (YVMV) या रोगास सहनशील (YVMV Disease Tolerant Okra Variety) आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन दर्जा सुद्धा वाढतो.