Ginger Rate: आल्याच्या दरात तेजी कायम; जाणून घ्या वेगवेगळ्या बाजार समितीत कसे आहेत भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही महिन्यापासून आल्याच्या दरात (Ginger Rate) असलेली तेजी अजूनही कायम आहे. आज ताज्या आल्याची सर्वात जास्त आवक मुंबई बाजार समितीत (Mumbai Bajar Samiti) 1139 क्विंटल एवढी झाली असून सर्वाधिक दर (Ginger Rate) सुद्धा 12,000 रू. प्रति क्विंटल मुंबई आणि राहता या बाजार समितीत मिळाला आहे. मुंबई पाठोपाठ पुणे बाजार समितीत आल्याची 545 क्विंटल आवक झाली असून सर्वसाधारण भाव (Bajarbhav) 5250 रू. एवढा मिळाला आहे. आज आल्याला कमीतकमी दर पुणे आणि पाटण या बाजार समितीत (Bajar Samiti) 2000 रू. प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. सर्वाधिक कमी आवक पाटण कल्याण आणि राहता येथे प्रत्येकी 3 क्विंटल एवढी झाली आहे. चंद्रपूर गंजवड बाजार समितीत आल्याची 12 क्विंटल आवक झाली असून सर्वसाधारण दर 10700 रू. जास्तीत जास्त दर (Ginger Rate) 11000 रू. आणि कमीतकमी दर 10500 रू. प्रति क्विंटल मिळाले आहे.

वेगवेगळ्या बाजार समितीत आल्याचे आजचे भाव (Ginger Rate)

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
     
अहमदनगर332500115007000
चंद्रपूर – गंजवड12105001100010700
पाटन3200025002250
श्रीरामपूर60300070005000
राहता34000120009000
अमरावती74300060004500
कल्याण3400060005000
अकलुज10500075007000
 पुणे545200085005250
पुणे-मोशी34500060005500
 मुंबई113980001200010000
इस्लामपूर93000100006500
वाई10600075007000
कामठी4400060005000
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.