Monsoon Forecast: पुढील काही दिवस असा असणार महाराष्ट्र आणि देशात पावसाचा अंदाज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पुणे हवामान विभागाने (IMD Pune) जाहीर केलेल्या अंदाजानुसार (Monsoon Forecast) पुढील काही दिवस महाराष्ट्रातील (Monsoon Forecast Maharashtra) काही भागात जोरदार, मुसळधार आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.

आज 10 ऑगस्ट रोजी कोकणातील (Konkan Monsoon) सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार अती जोरदार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे (Monsoon Forecast).

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागात (Ghat Area Of Center Maharashtra) तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुढील चार दिवस 13 ऑगस्ट पर्यंत विदर्भातील (Vidarbha Monsoon) बहुतेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेली आहे.

10 ते 13 ऑगस्ट दरम्यान मराठवाडयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ व त्यानंतर तीन दिवस अंशत: ढगाळ राहून कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे (Monsoon Forecast).

कसे असणारा देशातील वेगवेगळ्या राज्यातील हवामान? (Monsoon Update India)

हवामान खात्यानुसार, या आठवड्यात जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानमध्ये तुरळक ते मुसळधार पाऊस पडू शकतो. आयएमडीने उत्तर-पश्चिम, मध्य भारत, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 10 ऑगस्ट रोजी पंजाब, 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान हरियाणा, चंदीगड, 10 ते 13 ऑगस्ट दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेश आणि 10, 11, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस पडू शकतो.

10 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश, गोवा, आणि गुजरात विभागाच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे (Monsoon Forecast).