Vihir Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिंचन विहिरीच्या अनुदानात झाली वाढ! जाणून घ्या किती मिळणार अनुदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Vihir Anudan Yojana) एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता सिंचन विहिरीसाठी अधिकचे अनुदान (Subsidy) मिळणार आहे. शेतीसाठी सिंचन (Agriculture Irrigation) हा एक महत्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुद्धा सरकार अनुदान पुरवतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) देखील अशीच एक महत्वाकांक्षी योजना (Vihir Anudan Yojana) आहे.

या अंतर्गत शेतकर्‍यांसाठी सिंचन विहिरीसाठी अनुदान (Vihir Anudan Yojana) दिले जाते. या योजने अंतर्गत पूर्वी सिंचन विहिरीसाठी चार लाख रूपयांपर्यंतचे अनुदान दिले जात होते. मात्र आता अनुदानाची ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

शासनाच्या या महत्त्वाकांशी योजने अंतर्गत (Government Scheme) दिल्या जाणाऱ्या अनुदानात एक लाख रूपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी साठी पाच लाख रूपयांचे अनुदान (Vihir Anudan Yojana) मिळणार आहे.

विशेष म्हणजे या निर्णयाची अंमल बजावणी एक एप्रिल 2024 पासून होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार असून शासनाच्या या निर्णयाचे शेतकर्‍यांच्या माध्यमातून तोंड भरून कौतुक केले जात आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दरही विक्रमी वाढले आहेत. यामुळे शेतीकामांसहित सर्वच कामांचे मजुरीचे दर वाढले आहेत.

यामुळे सद्यःस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे.

यानुसार आता मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी (Vihir Anudan Yojana) पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. अनुदानात वाढ झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्र सरकारच्या 1 एप्रिल 2024 पासून मनरेगांतर्गत लागू झालेले मजुरी दर रक्कम 297 रुपये प्रतिदिन विचारात घेऊन, सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम 4 लाख 99 हजार 403 रुपये एवढे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आता सिंचन विहीर (Irrigation Well) अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा रुपये पाच लाख रुपये करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे वाढीव अनुदान एक एप्रिल 2024 पासून लागू राहणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नक्कीच सिंचन विहीर (Vihir Anudan Yojana) तयार करताना दिलासा मिळणार आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.