Krushi Karj Mitra Yojana: ‘कृषी कर्ज मित्र’ बनून करा शेतकर्‍यांना मार्गदर्शन; नोंदणी करण्यासाठी इथे करा अर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बहुतेक शेतकर्‍यांना (Farmers) कृषी कर्ज (Krushi Karj Mitra Yojana) घेताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरा जावे लागते. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, बँकेचे काम वेगवेगळी प्रक्रिया याबाबत शेतकर्‍यांना पुरेसे ज्ञान नसते किंवा ते करायला वेळ कमी पडतो. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात नवीन कृषी कर्ज योजना (Agriculture Loan) राबवण्यात येत आहे. या योजनेतून शेतकर्‍यांना वेळेत आणि सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ यशस्वीपणे आणि विना अडचण शेतकर्‍यांना मिळावा यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना (Krushi Karj Mitra Yojana) राबवण्यात येत आहे.  

कर्ज मित्रांची मदत

या योजनेतून शेतकऱ्यांना ‘कृषी कर्ज मित्र’ (Krushi Karj Mitra Yojana) यांच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. हे कर्ज मित्र शेतकऱ्यांना कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यापासून ते बँकेत कर्ज मंजूर करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करत.

शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. या योजनेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.

योजनेचे फायदे (Krushi Karj Mitra Yojana Benefits For farmers)

  • शेतकर्‍यांना वेळेत कर्ज मिळेल.
  • शेतकर्‍यांना कमीत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध होईल.
  • शेतकरी सावकारांच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून मुक्त होऊ शकतील.
  • या योजनेमुळे कृषी क्षेत्रात भांडवलाची गुंतवणूक वाढेल आणि कृषी क्षेत्राचा विकास होईल.

कृषी कर्ज मित्र होण्यासाठी नोंदणी आणि नियम

  • कृषी कर्ज मित्र (Krushi Karj Mitra Yojana) म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी (Registration For Krushi Karj Mitra).
  • नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
  • जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
  • कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकर्‍यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी.
  • कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकर्‍यांच्या संमतीने कर्ज मित्र करून मंजूरीसाठी बँकेमध्ये जमा करावा लागणार आहे.
  • कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्या मधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल.
  • कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधनपत्र देणे आवश्यक आहे.

कृषी मित्रास काय फायदा मिळणार? (Benefits For krushi Karj Mitra)

शेतकर्‍याचे कर्ज प्रकरणे मंजूर केल्यास कृषी मित्राला मानधन स्वरुपात रक्कम देण्यासाठी एक तालुकास्तरीय समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये गट विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांचा समावेश राहणार आहे.