हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर पश्चिम बंगाल (Weather Update Maharashtra) आणि ईशान्य झारखंडवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आहे, तसेच महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील आणखी एक कमी दाब प्रणालीमुळे राज्याच्या बहुतांश भागात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall In Maharashtra) पडण्याची अपेक्षा आहे.
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे (Weather Update Maharashtra). या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Monsoon Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
सध्या राज्यात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे शेतीलाही फायदा होणार आहे. पावसा अभावी तापमान आणि आर्द्रता वाढल्याने रहिवाशांची गैरसोय झाली होती. मात्र, पावसाने दिलासा दिला आहे (Weather Update Maharashtra) .
कोकण आणि घाटात मुसळधार पाऊस
हवामान विभागाच्या मते, उद्या कोकणात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरातही जोरदार पावसाचा इशारा (Weather Update Maharashtra) देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात असा असणार पाऊस
उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातही उद्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज (estimate) आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी (Weather Update Maharashtra) करण्यात आला आहे.
उष्णतेत वाढ होण्याची शक्यता
सोमवार दिनांक 26 ते शुक्रवार 30 ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा (Temperature Rise) चढण्याची शक्यता आहे.