हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील विविध राज्यामध्ये सोयाबीनच्या किमतीत (Soybean Market Rate Today) लक्षणीय घट झाल्याची आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे. यामुळे शेतकरी आणि बाजारातील भागधारकांमध्ये चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीवरून घाऊक किमतीत मागील महिन्याच्या आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मोठी घसरण दिसून आलेली आहे (Soybean Market Rate Today).
विविध राज्यांतील आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये सोयाबीनची सरासरी किंमत (Soybean Price) ₹4,793 प्रति क्विंटलपर्यंत घसरली, जी जुलै 2024 मध्ये ₹5,118 आणि ऑगस्ट 2023 मध्ये ₹5,021 वरून खाली आली. हे मासिक 6.35% ची घट दर्शवते आणि वर्षभरात 4.54% ची घसरण आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये सर्वात जास्त घसरण दिसून आली, जिथे मागील वर्षाच्या तुलनेत किमती अनुक्रमे 30% आणि 7% कमी झाल्या.
महाराष्ट्रात, ऑगस्टमध्ये सोयाबीनची किंमत 1.74% ने घसरली, ₹4,190 प्रति क्विंटलवर स्थिर झाली. जरी मासिक घट तुलनेने माफक होती, परंतु वर्ष-दर-वर्ष 11.23% ची घसरण बाजारातील (Soybean Market) परिस्थितीवर प्रकाश टाकते.
राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव (Soybean Market Rate Today)
आज 28 ऑगस्ट रोजी बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत ₹ 4110 प्रति क्विंटल आहे. सर्वात कमी बाजारभाव ₹ 2601 प्रति क्विंटल आहे, तर सर्वोच्च बाजारभाव 4675 प्रति क्विंटल आहे.
हिंगोलीतील कळमनुरी येथे सोयाबीनला सर्वाधिक जास्त दर (Soybean Market Rate Today) 5,000 रू. प्रति क्विंटल दर मिळालेला आहे. तर सर्वाधिक कमी दर बीड जिल्ह्यातील वडवणी बाजार समितीत 3,501 रू. प्रति क्विंटल एवढा मिळालेला आहे.
नागपूर बाजार समितीत आज सोयाबीनला जास्तीत जास्त दर 4,490 रू. सर्वसामान्य दर 4,393 रू. आणि कमीत कमी दर 4,100 रू. प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.
आज जालना येथील भोकरदन बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त दर 4,500 रू. सर्वसामान्य दर 4,400 रू. आणि कमीत कमी दर 4,200 रू. प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.
आज लातूर येथील जळकोट बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त दर 4,600 रू. सर्वसामान्य दर 4,300 रू. आणि कमीत कमी दर 4,000 रू. प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.
बुलढाणा येथील सिंदखेड राजा आणि सांगली येथील तासगाव बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त दर 4,620 रू. प्रति क्विंटल एवढा मिळालेला आहे.
हिंगोली येथील गजानन कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त दर 4,675 रू. सर्वसामान्य दर 4,553 रू. आणि कमीत कमी दर 4,250 रू. प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे (Soybean Market Rate Today).