पुढील ४-५ दिवस राज्यातल्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Rain Paus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील १-२ दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतली होती. मात्र राज्याच्या अनेक भागांमध्ये आता पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना देखील वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई मध्ये देखील मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत पाऊस कमबॅक करेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज सकाळपासून मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दिवसभर मुंबईत हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे तर उद्या आणि परवा म्हणजेच 17 आणि 18 जून रोजी मुंबईच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात पावसाचा अंदाज

दरम्यान आज दिनांक 16 पासून ते दिनांक 2० जून पर्यंत विदर्भामध्ये म्हणजेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता देखील नागपूरच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याची चेतावणी देखील नागपूरच्या हवामान विभागाने दिली आहे.

माध्य महाराष्ट्र आणि मुंबईतही बरसणार

याबरोबरच हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी देखील पुढचे तीन-चार दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता तसेच मुंबई ठाणे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची शक्यता असल्याचे के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे.
वेदर मन च्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईत हवामानाचा अनपेक्षित हलचाली नोंदल्या जात आहेत त्याचबरोबर पुढील तीन तासात मुंबई आणि ठाण्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहेत.