हॅलो कृषी ऑनलाईन: शिकण्याला वयाची अट नसते हे सिद्ध (Farmers Success Story) करून दाखविले आहे 64 व्या वर्षी, उत्तर प्रदेशातील शुभा भटनागर (Shubha Bhatnagar) या 64 वर्षाच्या महिलेने. शुभा यांनी या वयात केशर शेतीचा (Saffron Farming) प्रेरणादायी प्रवास सुरू करून त्याचे फायदेशीर व्यवसायात रुपांतर तर केलेच शिवाय या व्यवसायातून इतर महिलांना रोजगाराद्वारे स्थिर उत्पन्न देऊन त्यांना सक्षम बनवले (Farmers Success Story).
नेहमीच शेतीमध्ये रस असणाऱ्या शुभाने त्यांची आवड यशस्वी केशर शेती व्यवसायात बदलली, ज्याचा केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे तर स्थानिक समुदायावरही सकारात्मक परिणाम झाला. त्यांच्या केशर लागवडीच्या दुसऱ्या वर्षी, शुभा आणि तिच्या कुटुंबाने गेल्या वर्षी ₹16 लाख किमतीचे केशर उत्पादन केले आणि येत्या वर्षात त्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे (Farmers Success Story).
केशर पिकवण्याचे स्वप्न
आयुष्यभर संसार सांभाळणाऱ्या शुभाने जबाबदाऱ्या कमी झाल्यावर केशर शेती करण्याची इच्छा नवरा मुलगा आणि सून यांच्याजवळ व्यक्त केली. तिच्या इच्छेमुळे कुटुंबाला सुरुवातीला धक्का बसला पण लवकरच त्यांना तिचे कौतुक वाटून यासाठी पाठींबा मिळाला.
केशर शेतीसाठी काश्मीरची व्यावसायिक सहल
केशर शेतीचा निर्णय झाल्यानंतर शुभा आणि तिचे कुटुंब थेट केशर शेतकऱ्यांकडून शिकण्यासाठी काश्मीरला गेले. त्यांनी लागवडीची प्रक्रिया, केशर शेतीसाठी आवश्यक मातीचा प्रकार आणि केशर वाढण्यासाठी योग्य तापमान समजून घेण्यात एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ घालवला. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून केशर बल्ब देखील खरेदी केले.
केशर शेतीचे ज्ञान घेऊन या कुटुंब त्यांच्या गावी परतले आणि 560 चौरस फूट शीतगृह (Cold Storage) तयार करून नियंत्रित वातावरणात ट्रे वापरून केशर पिकवण्याचा प्रयोग सुरू केला (Farmers Success Story).
केशर लागवडीचा आधुनिक दृष्टीकोन
शुभाचा मुलगा आणि सून यांनी त्यांच्या अभियांत्रिकी पार्श्वभूमीसह, एरोपोनिक्स (Aeroponics Technique) वापरून घरामध्ये केशरची लागवड करण्याच्या पद्धतींवर संशोधन केले. ही पद्धत त्यांना केशरसाठी योग्य वाटली, ज्यासाठी विशिष्ट तापमान आणि आर्द्रता पातळी आवश्यक आहे.
काश्मीरच्या हवामानाची प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांनी उपकरणे आणि सेन्सर वापरून आणि केशर उत्पादनाच्या दहा वर्षांच्या डेटाचे विश्लेषण करून, त्यांच्या शीतगृहात केशर लागवडीसाठी आदर्श परिस्थिती तयार केली.
सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांत, केसरचे जांभळ्या रंगाचे सुंदर फूल आले आणि कापणीसाठी तयार झाले. कुटुंबाने त्यांच्या व्यवसायाचे नाव ‘शुभवनी स्मार्टफार्म्स’ (Shubhavni SmartFarms) ठेवले.
आव्हानांवर मात करून यश संपादन केले
या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागले, जसे मैनपुरीमध्ये काश्मीरच्या थंड, कोरड्या हवामानाची प्रतिकृती बनवणे हा सर्वात मोठा अडथळा होता. पण जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने तिने आव्हानांवर मात केली.
लागवडीनंतर तीन महिन्यांनी झालेल्या पहिल्या कापणीमध्ये केशराचे लक्षणीय उत्पादन मिळाले. कुटुंबाने त्यांचे उत्पादन बऱ्यापैकी नफ्यावर विकले आणि हे सिद्ध केले की त्यांचा उपक्रम व्यवहार्य आणि यशस्वी होता (Farmers Success Story).
स्थानिक महिलांचे सक्षमीकरण
शुभाच्या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी तिच्या समाजातील महिलांना मदत करण्याची तिची तीव्र इच्छा होती. परिसरातील अनेक महिलांना त्यांनी काम करण्याची संधी दिली (Farmers Success Story).
शुभवनी स्मार्टफार्म्समध्ये 20 हून अधिक महिला केशर उत्पादनाच्या विविध टप्प्यांत, बल्ब सुकवण्यापासून ते केशर कापणी आणि पॅकेजिंगपर्यंत काम करतात.
शिकण्यासाठी वयाची अट नाही
ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराचसा काळ गृहिणी म्हणून व्यतीत केला आहे, त्यांच्यासाठी तंत्रज्ञान आणि शेतीच्या जगात पाऊल टाकणे ही काही छोटी गोष्ट नव्हती. पण शुभाने हे आव्हान स्वीकारले. तिने शीतगृहात तापमान आणि आर्द्रता सेटिंग्ज कशी राखायची, संगणक ऑपरेशन्स कशी हाताळायची आणि विक्रीची देखरेख कशी करायची हे शिकले.
शुभाचा केशर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन विकला जातो. शुद्धता आणि गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तिच्या केशरची मागणी सतत वाढत आहे.
भविष्य: स्केलिंग अप आणि इतरांना प्रेरणा देणे
केशर लागवडीतील यशामुळे शुभा आणि तिचे कुटुंब उत्पादन वाढवण्याची योजना आखत आहेत. याद्वारे रोजगाराच्या माध्यमातून आणखी महिलांना सक्षम बनवणे आणि इतरांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रेरित करणे हे त्यांचे लक्ष आहे (Farmers Success Story).
इच्छुक उद्योजकांना संदेश
शुभाचे गृहिणी ते कृषी उद्योजक बनलेले परिवर्तन हा केवळ वैयक्तिक विजयच नाही तर तिच्या समाजासाठी आशेचा स्त्रोतही आहे.
“महिलांनो तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, प्रेरित राहा आणि तुम्ही काहीही करण्यास सक्षम आहात हे जाणून घ्या,” असे शुभाचे इतर महिलांना सांगणे आहे.