हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र (Soybean Procurement Center) तातडीने सुरू करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कृषी विभागाच्या वतीने मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे.
केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव (Soybean Procurement MSP) घोषित केले आहेत. यावर्षी सोयाबीनचे बंपर उत्पादन (Soybean Bumper Production) अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य शासनाने किमान हवी भावाने सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली असून नाफेड (NAFED) व एनसीसीएफ (NCCF)मार्फत सोयाबीन खरेदीची केंद्रे (Soybean Procurement Center) उभारण्याचे काम गतीने पूर्ण करावेत. राज्य शासन सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे (Soybean Farmers) नुकसान होऊ देणार नाही, असे यावेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.
लवकरच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनुदान (Cotton Soybean Subsidy) वाटप करण्यात येणार आहे. या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे (Soybean Procurement Center) तातडीने सुरू करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादित) अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे 91 लाख हेक्टर वरील 83 लाख शेतकऱ्यांना 4194 कोटी अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
36 लाख शेतकर्यांची केवायसी पूर्ण
राज्यात कापूस व सोयाबीन खातेदारांची एकूण संख्या 96.17 लाख आहे. त्यापैकी 75.31 लाख शेतकर्यांची क्षेत्रीय स्तरावर संमती पत्रे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 64.87 लाख खातेदार शेतकर्यांचा डाटा पोर्टलवर भरण्यात आलेला आहे. त्यापैकी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या डाटा सोबत 46.8 लाख शेतकर्यांचा डाटा जुळला असून, ई पीक पाहणी नावांच्या डेटा पैकी 36 लाख नावे जुळलेली आहेत. त्यामुळे 10 लाख शेतकर्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत. हे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.