Advance Estimate Of Kharif Production: अहवालानुसार यंदाच्या खरीप हंगामात तांदूळ, डाळींच्या उत्पादनात वाढ तर कापसाच्या उत्पादनात घसरण होण्याचा अंदाज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षीच्या 2024 खरीप हंगामात (Advance Estimate Of Kharif Production) भात, मका आणि कडधान्यांचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत वाढण्याची अपेक्षा आहे असा अहवाल कृषी मंत्रालयातर्फे (Ministry of Agriculture) देण्यात आलेला आहे. यावर्षीचा दीर्घ कालावधीच्या मॉन्सून (Monsoon) यामुळे सरासरीपेक्षा 6.4% जास्त पाऊस पडलेला आहे.

कृषी मंत्रालयाच्या मूल्यांकनानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भात, मका आणि कडधान्यांचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे, तर लागवड क्षेत्र कमी झाल्याने कापसाचे उत्पादन (Cotton Production) मात्र घसरण्याची शक्यता आहे (Advance Estimate Of Kharif Production). या खरीप हंगामासाठी विशेषतः तांदूळ आणि मक्याचे आशादायक उत्पादन असण्याची शक्यता आहे. तथापि, पीक विविधतेमुळे या हंगामात कापसाचे एकरी उत्पादन कमी राहण्याची अपेक्षा आहे.

यावेळी भाताची पेरणी (Paddy Sowing Area) 4% पेक्षा जास्त म्हणजेच 41 दशलक्ष हेक्टर (MH) झाली आहे. मागील वर्षी कापसाची लागवड 12.36 दशलक्ष हेक्टर होती जी यावर्षी 9% ने घटून 11.24 दशलक्ष हेक्टर झाली आहे (Advance Estimate Of Kharif Production).

कृषी मंत्रालय सध्या 2024-25 पीक वर्षासाठी पिकांचे पहिले आगाऊ अंदाज (Advance Estimate Of Kharif Production) तयार करण्यासाठी भागधारकांसोबत अनेक बैठका घेत आहे.

“आमचे एकूण तांदूळ उत्पादन पूरस्थिती असूनही गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल कारण यावर्षी भाताची लागवड जास्त झाली आहे,” असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.

कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात तूर आणि मूग उत्पादनाचा स्थिती मजबूत आहे. 12.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील कडधान्ये – तूर, उडीद आणि मूग पेरणी क्षेत्रात वर्षभरात 7.8% वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या सांगण्यानुसार तूर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता असली तरी, प्रमुख उत्पादक क्षेत्रांमध्ये अतिरिक्त पावसामुळे उडीद उत्पादनावर परिणाम होऊ शकतो (Advance Estimate Of Kharif Production).

एका आठवड्यापूर्वी, 109.66 दशलक्ष हेक्टरवर, भात, कडधान्ये, तेलबिया, भरड तृणधान्ये, कापूस आणि उसाची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत 2.2% वाढली होती. कापसाचा अपवाद वगळता या हंगामात भात, तेलबिया, भरड तृणधान्ये आणि उसाची पेरणी सामान्य पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त झाली आहे.

अधिका-यांनी सांगितले की, कडधान्ये आणि धानाची पेरणी महिना अखेरपर्यंत सुरू राहील. कृषी मंत्री चौहान यांनी यापूर्वी सांगितले होते की पावसाचा एकूण परिणाम देशातील एकूण पेरणी केलेल्या पिकांच्या सुमारे 1 – 2% इतकी झाली आहे तर पुढील दोन आठवड्यातील पाऊस पिकांसाठी नुकसानकारक असेल (Advance Estimate Of Kharif Production).  

कृषी मंत्रालयाने 2024-25 मध्ये 340 दशलक्ष टन (MT) विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे मागील पीक वर्षात अंदाजित 328.8 MT पेक्षा 3.4% जास्त आहे. यामध्ये खरीप हंगामातील 159.97 मेट्रिक टन, रब्बी हंगामातील 164 मेट्रिक टन आणि उन्हाळी हंगामातील 16.43 मेट्रिक टन उत्पादनाचा समावेश आहे (Advance Estimate Of Kharif Production).

केंद्रीय जल आयोगाच्या बातमीनुसार देशातील 155 प्रमुख जलाशयांची क्षमता त्यांच्या क्षमतेच्या 87% पर्यंत भरली आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.