हॅलो कृषी ऑनलाईन: आंबट लिंबू (Farmers Success Story) सुद्धा एखाद्याच्या आयुष्यात गोडवा आणू शकते, हे सिद्ध केले आहे, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Farmer) मॅनेजमेंट ग्रॅज्युएट असलेले आनंद मिश्रा (Anand Mishra) यांनी. सुरुवातीला फर्निचर कंपनीत नोकरी करणाऱ्या मिश्रा कल हळूहळू शेतीकडे वाढत गेला. सुरुवातीला विविध पिकांची लागवड करणारा एक सामान्य शेतकरी म्हणून शेतीची सुरुवात केली असली तरी हळूहळू ते बागायती शेती म्हणजे लिंबू लागवडीकडे वळले. लिंबू शेतीत त्यांनी एवढी प्रगती केली की अवघ्या काही वर्षांतच त्यांची ‘उत्तर प्रदेशातील ‘लेमन मॅन’ (Lemon Man) ही ओळख निर्माण झाली. प्रत्येक हंगामात लिंबूच्या तोडणीतून 7 लाखांची कमाई करणाऱ्या या शेतकर्याची यशोगाथा (Farmers Success Story) जाणून घेऊ या.
आनंद मिश्रा यांना कधीच गहू आणि तांदूळ यासारख्या पारंपारिक पिकांच्या लागवडीत रस नव्हता. कारण त्यांना वाटायचे ही पिके फार फायदेशीर नाही. नफा देणार्या पिकांची माहिती घेताना एकदा त्यांच्या मनात लिंबू शेतीची (Lemon Farming) कल्पना आली आणि त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयातील अधिकार्यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती घेतली (Farmers Success Story).
सुरुवातीला लिंबाच्या सामान्य जातींवर प्रयोग केल्यानंतर मिश्रा यांनी त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी रसदार थाई जातीच्या लिंबाची (Thai Lemon Variety) लागवड करायला सुरुवात केली. लिंबूच्या या विशिष्ट जातीपासून 30 ते 50 ग्रॅम वजनाच्या सामान्य लिंबाच्या तुलनेत 100 ग्रॅम वजनाची मोठी फळे मिळतात. परिणामी मिश्रा यांच्या लिंबू शेतीच्या उत्पादनात तब्बल 20 पट वाढ झाली. ते सांगतात की गेल्या वर्षी त्यांनी 400 क्रेट (100 टन) लिंबू काढले, जे स्थानिक बाजारात 40 ते 70 रुपये प्रति क्रेट विकले गेले. दोन एकरावर पसरलेल्या त्याच्या बागेत वर्षभर लिंबूवर्गीय फळे येतात आणि त्याच्या भरघोस कापणीमुळे त्याला प्रत्येक हंगामात 7 लाख रुपये मिळतात. एवढेच नाही तर ते लिंबू निर्यात सुद्धा करतात. त्याच्या या उपक्रमामुळे त्यांनी अनेकांसाठी रोजगारही निर्माण केला आहे (Farmers Success Story).
आज मिश्रा हे फक्त रायबरेली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशातील एक प्रसिद्ध शेतकरी आहेत, त्यांच्या कचनावन गावात ते लिंबू पिकवतात. त्यांच्या यशाची कीर्ति लवकरच पसरली आणि त्यांना प्रतिष्ठित समजला जाणारा चौधरी चरणसिंग किसान सन्मान हा सर्वोच्च सन्मान मिळाला (Farmers Success Story).
लिंबू लागवडीची कल्पना त्यांना आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मिळाली असे आनंद मिश्रा सांगतात. या राज्यात उपजीविकेसाठी लिंबासारखी पिके घेतली जातात. पारंपारिक पिके फारशी फायदेशीर नाहीत, असे ते म्हणतात.
लिंबूच्या बंपर उत्पादनाचे गुपित (Farmers Success Story)
लिंबाचे बंपर पीक कसे घेतले याविषयी बोलताना मिश्रा सांगतात की जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी ते शेतात उंच गवत वाढवतात जे नंतर हिरवळीचे खत म्हणून उपयुक्त ठरतात. त्यानंतर, ज्या ओळींमध्ये लिंबूची रोपे लावायची आहे ती दिशा पूर्व-पश्चिम असावी जेणेकरून वादळामुळे झाडे उन्मळून पडणार नाहीत. त्यांनी रोपे आणि ओळींमध्ये 10×10 फूट अंतर राखण्याची सूचना सुद्धा शेतकर्यांना केली आहे. याशिवाय, रोपांची लागवड जमिनीत किमान एक फूट खोलीवर करावी. ज्या जमिनीत लिंबूची लागवड करायची आहे त्याचा सामू 6 ते 7 दरम्यान असावा. सेंद्रिय आणि अजैविक दोन्ही खतांचा वापर माती समृद्ध करण्यासाठी आणि बुरशीजन्य रोग किंवा किडींच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी चांगला आहे, असे ते म्हणाले.
शेतीची काहीच माहिती नाही असा सामान्य व्यक्ती सुद्धा मेहनतीने आणि अभ्यासाने यशस्वी शेतकरी होऊ शकतो हेच आनंद मिश्रा यांच्या यशोगाथेतून (Farmers Success Story) सिद्ध होते.