राज्यात पावसाचा जोर वाढला, लवकरच मान्सून संपूर्ण देश व्यापणार

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून दुबार पेरणीचे संकट टाळले आहे. आरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे आज दिनांक 13 रोजी राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओरिसाच्या किनार्‍यालगत बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पश्चिम राजस्थान पासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यातच अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचे प्रवाह वाहत आहेत त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अनेक भागात पाऊस पडत आहे त्यामुळे हवेत गारवा चांगलाच जाणवतो आहे. कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय सोमवारी 12 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत मालेगाव येथे 34.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

राज्यातील अनेक भागात पाऊस पडत असताना व कमाल तापमानात चांगली घट झालीये. विदर्भात अधूनमधून पडत असल्याने या भागात 28 ते 34 अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात 31 ते 33 अंश सेल्सिअस मध्ये महाराष्ट्रात हवेत गारवा असल्याने कमाल तापमान 21 ते 34 अंश सेल्सिअस कोकणात 27 ते 31 अंश सेल्सिअस तापमान होते.

तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरावरून येत असलेले बाष्पयुक्त वारे, ढगांच्या वाढलेले अच्छादन पावसाला सुरवात झाल्याने राजस्थान आणि पंजाबचा बहुतांशी भाग हरयाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून प्रगती केल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. वायव्य भारतात 19 जून नंतर थांबलेला मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून लवकरच मान्सून देश व्यापण्याची शक्यता आहे.