राज्यात नंदुरबारमध्ये सर्वात कमी पाऊस , ‘ही’ पिके घेण्याचा हवामान विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. काही ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पावसाची सर्वात कमी नोंद झाली आहे. यावर्षी राज्यात नंदुरबार येथे सर्वात कमी पाऊस झालाय. 15 जिल्ह्यात मुसळधार आणि १६ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात यावेळेस पावसाने हुलकावणी दिल्याने फक्त 44 टक्के इतकाच पाऊस या जिल्ह्याला झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत राज्यातील सर्वात कमी पाऊस झाला आहे अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे सचिन फड यांनी दिली आहे.

या पिकांची लागवड करण्याचे आवाहन

नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 45 टक्के पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची लागवड करावी बाजरी, सूर्यफूल, तूर या पिकांची लागवड करावी असा हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

यावर्षीचा पावसाचा विचार केला तर या वर्षी मान्सून मध्ये बंगालच्या उपसागरात आसमान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कमी जास्त पाऊस होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होतं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात समाधानकारक पाऊस झाला तर विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला. मात्र उत्तर महाराष्ट्र पावसाचा प्रमाण कमी होतं त्यातही नंदुरबार जिल्ह्याला केवळ 44 टक्के इतकाच पाऊस झाला आहे.