पावसाचा अजब खेळ ! इतर भागात समाधानकारक तर धुळे, नंदुरबार, भागात प्रमाणापेक्षा कमीच

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या १५ दिवसात राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने राज्यातील अनेक भागात चांगलीच ओढ दिली आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी बरसल्या. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात हंगामी १ जूनचा पाऊस समाधानकारक झाला आहे.

हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘राज्यातला हंगामी पाऊस १ जून पासूनचा समाधानकारक दिसत आहे. मात्र राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव मध्ये सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या ७ दिवसातील पावसाची स्थिती पुढच्या नकाशात दिसत असून गेल्या आठवडयात राज्यात पावसाने ओढ दिलेली आहे. अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. मागील २४ तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान धुळे, नंदुरबार भागात कमी पाऊस झाल्याने येथील शेतकरी मात्र चिंतेत आहेत.

राज्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस

आजपासून येत्या शनिवार पर्यंत राज्याला अनेक भागात माध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मात्र पावसाला पोषक हवामान नसल्याने विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा उद्याचा(५) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कसा असेल पाऊस ?

–मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य, सकारात्मक असेल. तसेच 95 ते १०५ टक्के पाऊस होईल अशी संभावना आहे.
— दुसऱ्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये सर्वत्र चांगला पाऊस होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण देशामध्ये काही भागांमध्ये सामान्य ते सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडण्याची संभावना आहे.
— ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य राहील आणि त्यांची संभावना 94 ते 106 टक्के असेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.