हुश्श!! राज्यात आठवडाभर पावसाची विश्रांती; शेतीच्या कामांना वेग येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाने गेल्या दिवसापासून दडी मारली आहे. असे असले तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यापैकी कोल्हापूरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस होत आहे. परंतु शुक्रवारपासून पुढील किमान आठवडाभर तरी पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. अनुकूल वातावरण नसल्याने पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात आणखी आठवडाभर पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज ही वर्तवण्यात आला आहे.

मध्य प्रदेश , राजस्थानमध्ये सुरू असलेला पावसाचा जोर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओसरण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये 7 ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे.तर ओडिशा वगळता मध्य भारत, महाराष्ट्र ,गुजरातमध्ये पुढील आठवडाभर पावसाची दडी कायम राहील.

घाटमाथ्यावर पावसाचा इशारा

दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहत असून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.