PM Kisan : आत्मनिर्भरतेसाठी आता राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ; मोदींचे शेतकऱ्यांना खास आवाहन

modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी P M KISAN योजनेचा नववा हप्ता शतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून तब्बल 19 हजार 500 कोटी रुपये थेट देशातील 9. 75 करोड शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. अर्थात हे पैसे टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना

खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे. आज आपला देश भारत छोडो आंदोलनाचं स्मरण करत आहेत. या मिशनच्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बियाण्यापासून, उत्तम तंत्रज्ञान पुरवण्यात येईल. पारंपारिक तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. कृषी मालाच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. भारताची ओळख कृषी निर्यातदार म्हणून आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही.

रोजगाराच्या संधी वाढतील

खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मोदी म्हणाले.

देवेंद्र झापडेकर यांच्याशी संवाद

या कार्यक्रमाच्या दरम्यान राज्यातील विविध प्रगतिशील शेतकऱ्यांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रचे रत्नगिरी जिल्ह्यातील देवेंद्र झापडेकर यांच्याशी मोदींनी बातचीत केली. झापडेकर यांच्या बाबतीत असलेली विशेष बाब म्हणजे युवावा शेतकरी देवेंद्र यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला आहे. चांगले शिक्षण घेतले असताना देखील त्यांनी शेतीकडे आपला मोर्चा वळवला. याबाबत मोदींनी त्यांचे कौतुक केले.

https://www.facebook.com/hellokrushi/videos/1253699101755291/

शेतकरी देवेंद्र यांनी जैविकरीत्या आंबा पिकवण्याचा प्रक्रिया उद्योग करतात. कार्बाइड द्वारे पिकवलेल्या आंब्यापेक्षा जैविक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांना चांगली मागणी असते अशी माहिती देवेंद्र यांनी दिली आहे. शेतकरी देवेंद्र यांनी मॅंगो रीपेनिंग चेंबर तयार करून स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू केला या उद्योगातून त्यांना चांगला फायदा मिळाल्याचं त्यांनी मोदींना सांगितलं. तसेच हा उद्योग उभारण्यासाठी कर्जाची प्रक्रिया देखील चांगल्या पद्धतीने मिळत गेली अशी माहिती देवेंद्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. तसेच पुढे बोलताना मोदी म्हणाले की यापूर्वी मागील ६-७ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची स्थिती वाईट होती . आता त्या तुलनेने सोप्या पद्धतीने कर्ज मिळते. यावेळी देवेंद्र यांनी खाण्यासाठी मोदींना रत्नागिरीला येण्याची विनंती केली.

मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना

मोदी सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या सर्वाधिक महत्तवाकांक्षी योजनेपैकी P M KISAN योजना ही आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये 2000च्या तीन हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा केले जातात. साध्याची कोरोना परिस्थिती आणि वातावरणातील बदल यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या हप्त्याची मोठी प्रतीक्षा असते.