हॅलो कृषी ऑनलाईन : जुलैच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर पाऊस काहीसा लपून बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांची पेरणी केली आहे. पिक वाढीच्या अवस्थेत आहेत. असे असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र राज्यात पुन्हा पाऊस परतण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिले आहेत. हवाम विभागाने दिनांक ११-१५ या कालावधीत पावसाची स्थिती कशी असेल याबाबत माहिती दिली आहे.
येत्या ५ दिवसात कोकण विभागामध्ये बहुतांशी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल. मध्य महाराष्ट्रात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हलका त मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये अतिशय तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
पुढील 5 दिवस 11 ऑगस्ट ते 15 दरम्यान अपेक्षित हवामान : pic.twitter.com/5amLfy4Kec
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 11, 2021
विदर्भ मराठवाड्यात उन्हाचा चटका
सध्या पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे मंगळवारी दिनांक दहा रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत अकोला येथे सर्वाधिक 35. ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा मध्ये तापमान 34 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली असून उकाड्यात हे वाढ झाली आहे.