करनालमध्ये भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी रक्तबंबाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :देशातील काही भागात अद्यापही कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. हरियाणा येथील करनालमध्ये भाजपच्या बैठकीचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी तसेच समाज माध्यमातून याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

https://twitter.com/RahulGandhi/status/1431571975256821763?s=20

फिर ख़ून बहाया है किसान का…

तर या घटनेबाबत ट्विट करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, ‘फिर ख़ून बहाया है किसान का,शर्म से सर झुकाया हिंदुस्तान का! ‘ अशा आशयाचे ट्विट करीत त्यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ही दुर्दैवी घटना: राकेश टिकैत

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी लाठीमारावर नाराजी व्यक्त केली आहे. हरियाणातील बसताडा टोलनाक्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. तर, 5 सप्टेंबरला मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या महापंचायतीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.

काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

काँग्रेस नेते आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि हरियाणा सरकारचा निषेध केला आहे. मारा मारा शेतकरी आहेत, यांचं धाडस कसं झालं उद्योगपती सरकारकडून आपला हक्का झाला? छातीवर हात ठेऊन हा जय जवान आणि जय किसानच्या घोषणा देणारा भारत राहिलाय का? असा सवाल श्रीनिवास यांनी केला आहे.