हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी ई -पीक पाहणी ऍप विकसित केले आहे. या ऍप वर नोंदणी करिता ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख होती मात्र आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. ई -पीक पहाणीसाठीची अंतिम मुदत आता १५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच तुम्ही अद्यापही ई पीक पाहणी केली नसेल तर चिंता करू नका कारण तुम्हाला आता १५ ऑक्टोबर पर्यंत ई -पीक पहाणी करता येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे.
‘ई-पिक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्याची हे पहिलेच वर्ष आहे. सुरवातीला 15 सप्टेंबर पर्यंतच मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याअनुशंगाने 30 सप्टेंदरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही नोंदणी करण्यास सुरवात होती. पण राज्यात अतिवृष्टी झाल्याने पिकाची नोंद करणे शक्य झाले नाही त्यामुळे आता 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे
1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.
2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.
3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.
5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.