हॅलो कृषी ऑनलाईन : रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आता रत्नागिरीच्या आंबा उद्योगाला आणखी उभारी मिळणार आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 141 प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे.
महत्वाचे मुद्दे
–आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना केंद्र सरकारने राबविण्याचे निश्चित केले आहे.
–त्यामधूनच रत्नागिरी जिल्ह्यातील 141 उद्योजकांना आंबा प्रक्रिया उद्योग उभारणीला बळकटी देण्याचा सरकारचा मानस आहे.
— 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालवधीत ही योचना राबवायची असून प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या उत्पादनावर येथे प्रक्रिया केली जाणार आहे.
-लाभार्थ्यास एकूण प्रकल्पाच्या 35 टक्के रक्कम तर जास्तीत जास्त 10 लाख रुपये हे अनुदान दिले जाणार आहे.
कुठे कराल अर्ज ?
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 2020 – 21 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 141 प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी नवीन उद्योग उभारू इच्छिणाऱ्या किंवा सध्या असलेल्या उद्योगाचं विस्तारीकरण वा आधुनिकीकरण करू इच्छिणाऱ्यांना जिल्हा कृषी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज देखील करावयाचा पर्याय उपलब्ध आहे.
या योजनेचा लाभ वैयक्तिक पातळीवर किंवा गट स्वरूपात घेता येऊ शकेल. अर्ज सादर करणे सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठपुरावा करणे अशा विविध कामांमध्ये इच्छुक लाभार्थ्यांना सह्या करण्यासाठी जिल्हास्तरावर चार व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे त्यामध्ये डॉ आनंद तेंडुलकर, अमर पाटील ,उमेश वैशंपायन, शेखर विचारे यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी होणार आहे.