एक रकमी एफआरपी जाहीर करा अन्यथा संघर्ष अटळ ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

Raju Shetti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू,गुरुदत्त, कुभी कासारी, दत्त सह आठ कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शीरगुप्पी सह काही कारखान्यांनी एक रक्कमी एफ आर पी जाहीर केली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील एका ही कारखान्याने एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही.

जे कारखाने एक रक्कमी एफ आर पी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील मात्र जे जाहीर करणार नाहीत ते कारखाने बंद पाडू, तोडी बंद पाडू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. खराडे म्हणाले, नुकतीच जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद पार पडली. माजी खा राजू शेट्टी यांनी एक रकमी एफ आर पी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत अशी मागणी केली आहे तसाच ठराव परिषदेत झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली आहे.

त्या कारखान्यांनी पहिल्या टप्प्यात प्राधान्याने महापुरात बुडालेला ऊस गाळप करावा. त्या कारखान्यांच्या बाबतीत ऊस तोडी सुरू ठेवण्याचा निर्णय झाला मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील. मात्र जे कारखाने एक रकमी एफ आर पी जाहीर करणार नाहीत त्यांचा हंगाम सुरू होवू देणार नाही. त्याच्या तोडी बंद पाडल्या जातील. हंगाम लांबणीवर पडू नये यासाठी लवकरात लवकर एक रक्ममी एफ आर पी जाहीर करून हंगाम सुरू करावा अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा खराडे यांनी दिला आहे.