हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या अवकाळी पावसाने खरीपातल्या शेवट्च्या पिकाचे म्हणजेच तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तूर ऐन शेंगा भरायच्या अवस्थेत असताना अवकाळी पाऊस झला, सतत ढगाळ वातावरण यामुळे तुरीवर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तूर वळून जात आहे. तुरीचा अगदी बुडापासून खराटा होत आहे. अशा खराटा झालेल्या झाडाच्या शेंगा काढव्यात तरी कशा? असा प्रश्न शेतकऱ्यांच्यात आहे.
असे कराल व्यवस्थापन
–मर हा बुरशीजन्य रोग आहे त्यामुळे तुरीच्या खोडावर ठिपके भेगा पडून झाडाच्या मुळाकडे अन्नद्रव्याचा पुरवठा होऊ दिला जात नाही.
— त्यामुळे तूर ही मुळापासून वाळायला सुरुवात होते. दरवर्षी अंतिम टप्प्यात असताना या मर रोगाचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे.
— त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत गेली वाया जाते आणि अपेक्षित उत्पादनही मिळत नाही वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे.
— त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलोऱ्यात असलेल्या तुरीला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मॅटॅ्ल्याकझिल अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति एक लिटर पाण्यात एक ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी गरजेच आहे.
— याशिवाय वातावरण स्वच्छ असताना त्याची फवारणी फायदेशीर राहणार आहे.
शेतकरी मित्रांनो हे पण वाचा :
PM KISAN मोठी बातमी: ‘ई-केवायसी’ पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना दहावा हप्ता मिळणार नाही; जाणून घ्या
हुमणीच्या बंदोबस्तासाठी रुईच्या पानांचा रस आहे का प्रभावी ? जाणून घ्या
रब्बी विम्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर; जाणून घ्या पीकांच्या विम्याची प्रीमियम रक्कम कशी ठरवली जाते?