हॅलो कृषी ऑनलाईन : या दिवसात गृहिणींची चटणी किंवा तिखट मसाला करण्याची लगबग सुरु असते . त्यामुळे मिरचीबाजारात मोठी उलाढाल झालेली पहायला मिळते. सध्या नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दरही टिकून आहेत. मात्र मागील ५ वर्षातला विक्रमी दर मिरचीला मिळाला आहे मिरचीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार येथे लाल मिरचीला ४ हजार रुपये प्रति क्विंटल विक्रमी दर मिळाला आहे.
तब्बल 1 लाख टन लाल मिरचीची आवक
–मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाला तर दर हे घसरतात हे बाजारपेठेचे सुत्रच आहे.
— नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवकही आणि दरही विक्रमीच मिळत आहे.
–लगतच्या राज्यातील शेतकरी देखील याच बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणत आहेत.
–डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत.
–येथील बाजारपेठेमध्ये दर हे गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत.
— शेतकऱ्यांना येथील दराबाबत खात्री असल्यानेच आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे.
चटणीच्या दरावर परिणाम
घरगुती चटणी करण्यासाठीच येथील मिरचीचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या इथे मिळणारे दर हे शेतकऱ्यांसाठी चांगले असले तरी ग्राहकांना मात्र जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे यंदा चटणी महाग होणार असल्याची चिन्हे आहेत. नंदुरबार येथील बाजार सिमितीचा परिसरावर जणू काही लाल गालीचाच अंथरला असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी वातावरणामुळे घटलेली आवक पुन्हा सुरु झाली आहे.