हॅलो कृषी ऑनलाईन : खारीप हंगामातील शेवटचे पीक म्हणजे तूर … तुरीच्या पिकाची काढणी, मळणी राज्यात जोमात सुरु आहे. शिवाय बाजारभावाचा विचार करता तुरीला हमीभाव केंद्रापेक्षा जास्त भाव मिळतो आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्रापेक्षा इतर कृषी समित्यांना आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत (२८) रोजी सहा ते साडेसहा हजार क्विंटल इतकी मोठी आवक झाली. त्यामुळे समितीने दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आज (३१) मात्र बाजार समितीत तुरीचे व्यवहार होतील अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी अकोला बाजार समितीत तुरीची बम्पर आवक झाल्यामुळे एका दिवसात मोजमाप आणि व्यवहार करणे नसल्यामुळे बाजार समितीने दोन दिवस शेतकऱ्यांना बाजारात माल न आणण्याचे आवाहन केले होते. आज (३१) रोजी मात्र व्यवहार पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले. आता सोयाबीन नंतर तूर पिकावर शेतकऱ्यांची मदार आहे. बदलते हवामान आणि तुरीवरील मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान पुढच्या १५-२० दिवसात तुरीच्या आवकेत वाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती तूरीचे मोठ्या प्रमाणात आवक होत आहे तर तुरीला चांगला दरही मिळतो आहे दिनांक 28 रोजी तुरीला किमान 5100 व कमाल 6695 रुपये इतका दर मिळाला आहे. 5900 रुपये मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे असल्याचे दिसून येत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची मोठी आवक होत आहे मोजमाप आणि व्यवहाराच्या दृष्टीने दोन दिवस तूर विक्रीला न आणण्याचे आवाहन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी केलं होतं. त्यांनी असंही म्हटलं आहे की शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तूर विक्रीला आणावी.