हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्राशी निगडित मोठ्या घोषणा आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या. मात्र त्याबरोबरच सहकार क्षेत्रालाही मोठा दिला मिळाला आहे. अर्थसंकल्पात सहकारी संस्थांचाही ट्रक्स 18.5 टक्क्यांवरून 15 टक्केवर आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहकारी संस्थांच्या पैशामध्ये मोठी बचत होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच साखर कारखान्यांना तब्बल 9 हजार कोटींची सूट मिळाली होती. यासाठी राज्यातील नेत्यांनी केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेतली होती.
आता सहकारी आणि खासगी संस्थांमध्ये समान कर
सहकारी संस्थांवर 18.5 टक्के टॅक्स तर दुसरीकडे खासगी संस्थांना मात्र, 15 टक्केच टॅक्स होता. त्यामुळे विकास कामात अडथळा आणि सहकारी संस्थांना पाहिजे तसे पाठबळ मिळत नव्हते मात्र, अर्थसंकल्पातील निर्णयामुळे आता ही तफावत दूर होणार आहे. सहकारी संस्थांचाही विकास होणार आहे.
साखर कारखान्यांवरील कर रद्द केल्यानंतरचा मोठा निर्णय
साखर कारखान्यांवरील आयकर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातून एक शिष्टमंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. त्या दरम्यान, साखर कारखान्यांसमोरील अडचणी काय आहेत याची सविस्तर माहीती दिल्यामुळेच केंद्र सरकारने साखर कारखान्यांवरील तब्बल 9 हजार कोटींचा आयकर रद्द केला होता. ही बाब साखर उद्योगाला चालना देणारी आहे. हा मुद्दा महाराष्ट्रातील नेत्यांमुळे मार्गी लागला त्यामुळे ही बाब महाराष्ट्रासाठी अधिक आनंददायी असल्याचे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणवीस यांनी व्यक्त केले आहे. यामध्ये आजच्या अर्थसंकल्पात अणखीन सकारात्मक बाब झाली ती सहकार आणि खासगी संस्थासाठी आता वेगळा नियम नसून 15 टक्के कर राहणार आहे.