हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने हा ‘पंतप्रधान किसान संपदा’ योजनेला 2026 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. मंत्रालयाची ही महत्वकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत येत्या काळासाठी 4600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या ट्विटर हँडल वर या योजनेसंदर्भात ट्विट केला आहे.
प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही अशी एक सर्वसमावेशक योजना आहे जी शेतीपासून किरकोळ दुकानापर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळीतील व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये योगदान देते. अन्नप्रक्रिया विभागाच्या माहितीनुसार ही योजना अन्नप्रक्रिया क्षेत्रातील विकासाला चालना देणारी आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल.
काय आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना?
केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सहा हजार कोटी रुपयांच्या तरतुदी सह कृषी सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी ‘संपदा’ या नावाने ही योजना सुरू केली होती. ऑगस्ट 2017 मध्ये या योजनेचे नाव बदलून ‘पंतप्रधान किसान संपदा योजना’ असे करण्यात आले. पंतप्रधान किसान संपदा योजना ही कॉल्ड चेन मूल्यवर्धित पायाभूत सुविधा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा कृषी प्रक्रिया प्लास्टर साठी चा पायाभूत सुविधा अन्नप्रक्रिया क्षेत्राचा विकास आणि विस्तार यांचा समावेश असलेली ही एक योजना आहे.